
Solapur, 26 January : पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमची (जीएसबी) लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे, त्यामुळे जनतेने घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाने केले आहे.
सुमारे 40 वर्षे वय असलेल्या या व्यक्तीला पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमची (GBS) लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने त्या रुग्णाला 18 जानेवारी रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्या रुग्णाला सुरुवातीला रुग्णालयात आयसीयूमध्ये (ICU) ठेवण्यात आले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला जनरल रूममध्ये हलवण्यात आले होते. मात्र, शनिवारी अचानकपणे त्याला श्वास घेण्यात अडचण येतं असल्याने त्याला पुन्हा एकदा आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते.
दरम्यान, उपचारदरम्यान त्या रुग्णाची प्राणज्योत मालवली. त्या रुग्णाला पुण्यात GBS ची लागण झाली होती, याची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. त्याशिवाय त्या रुग्णाचा व्हीसेरादेखील पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, संबंधित रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबतीत प्राथमिक माहिती ही शवविच्छेदन आणि व्हिसेरा तपासणी अहवाला नंतरच प्राप्त होईल, असेही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मात्र GBS बाबतीत कोणीही अफ़वा पसरवू नये, तसेच लोकांनी घाबरून जाऊ नये. लक्षणे दिल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सोलापूर पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या रोगाची ही आहेत लक्षणे
श्वास घ्यायला त्रास होणे
हातापायांना मुंग्या येणे
रक्तदाबाची समस्या निर्माण होते
चालताना दम लागणे
चेहऱ्यावर कमजोरी येणे
अतिसार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.