शंभूराज देसाई उंडाळकरांच्या भेटीला; जिल्हा बॅंकेच्या पार्श्वभूमीवर बंद खोलीत चर्चा

जिल्हा बँकेच्या Satara dcc bank निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटलांसह Udayasinh patil गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनाही shambhuraj desai राष्ट्रवादीने Nationalist congress डावलले आहे. त्याचा राग दोघांच्याही मनात आहे.
Shambhuraj Desai, Udaysinha Undalkar
Shambhuraj Desai, Udaysinha Undalkarsarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे मतदान रविवारी (ता. २१) होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड सोसायटी गटातील उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज भेट घेतली. दोघांनी कराड बाजार समितीत अर्धातास बंद खोलीत चर्चा केली. बँकेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

सातारा जिल्हा बॅकेची रणधुमाळी सुरु आहे. बॅंकेच्या कऱ्हाड सोसायटी गटातुन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर रिंगणात आहेत. दोन्ही गटांनी विजयाचा दावा केल्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीचे मतदान अवघ्या दोनच दिवसावर आल्याने जोरदार घमासान सुरु आहे. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटलांसह गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनाही राष्ट्रवादीने डावलले आहे. त्याचा राग दोघांच्याही मनात आहे.

Shambhuraj Desai, Udaysinha Undalkar
सातारा तालुक्यातील सर्व मते राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेललाच : शिवेंद्रसिंहराजे

त्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री देसाई यांनी आज उंडाळकर यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. त्यांची मतदानासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्वाची मानली जात आहे. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, प्रा. धनाजी काटकर आदी उपस्थित होते.

Shambhuraj Desai, Udaysinha Undalkar
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

दंगे करणाऱ्यांना अद्दल घडवणार

अमरावती, नांदेड आणि मालेगाव परिसरातील दंगल पोलिसांनी वेळेत नियंत्रणात आणली. तेथे झालेल्या दंगली पूर्वनियोजित नसल्याचा निष्कर्ष कोणी काढला हे माहिती नाही. मात्र, दंगेखोरांची ओळख पटलेली आहे. जाणीवपूर्वक दंगे करणाऱ्या दंगलखोरांना पोलिस सोडणार नाहीत, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. राज्यात दंगल काबुत करण्यात सरकारला अपयश आले, असा आरोप चुकीचा असून वेळेत जादा कुमकेसह पोलिस अधिकारी घटनास्थळी चौवीस तास हजर होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com