`वाहतूक पोलिस भाविकांची लूटच करतात... त्यांचे ऑफिस शिर्डीत नको`

शिर्डी देवस्थान हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान समजले जाते.
shirdi sanshtan
shirdi sanshtanSarkarnama
Published on
Updated on

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - शिर्डी देवस्थान हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान समजले जाते. जगभरातील अनेक भाविक रोज शिर्डीला येतात. मात्र तेथील पोलिस व इतर व्यवस्थेची भाविकांना मदत मिळण्या ऐवजी त्रास होत आहे. त्यामुळे शिर्डीतील पोलिसांची वाहतूक शाखाच रद्द करण्याच ठराव शिर्डीच्या ग्रामसभेत झाला आहे. (Shirdi Police News Updates)

वाहतूक पोलिसांनी कुटुंबीयांसह दोन तास गाडी अडवून धरली. दहा हजार रुपये मागितले. तडजोड एक हजारात झाली. दोनशे रुपयांची पावती दिली आणि आठशे रुपये खिशात घातले, अशा शब्दांत एका साईभक्ताने मोबाईल फोनद्वारे आजच्या ग्रामसभेत तक्रार केली. ही कसली वाहतूक शाखा, ही तर भाविकांना दररोज लुटणारी शाखा, असा गंभीर आरोप करीत आजच्या ग्रामसभेत, शिर्डीतील पोलिसांची वाहतूक शाखाच रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

shirdi sanshtan
असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

दरम्यान, भाविकांची लुटमार थांबली नाही तर हातात दंडुके घेऊन बंदोबस्त करण्याचा इशारा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्याची वेळ आली. यापूर्वी या प्रश्नावर खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी कमलाकर कोते व त्यांच्या सहकाऱ्यांसह मैदानात उतरून, भाविकांची अडवणूक करणाऱ्या वाहतूक शाखेचे पोलिस व अधिकाऱ्यांना जाब विचारला. काही काळ बंद झालेली अडवणूक पुन्हा सुरू झाली. ग्रामस्थांनी मोर्चे काढले, निवेदने दिली. फलनिष्पत्ती शून्य. विशेष म्हणजे, राज्यात कुठल्याही पक्षाचे सरकार असो; शिर्डीकडे येणा-या प्रत्येक महत्त्वाच्या रस्त्यावर साईभक्तांची वाहने अडविण्याचा कार्यक्रम सुरू असतो. आता पुन्हा सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले. ग्रामसभा घेऊन शिर्डीतली वाहतूक शाखा बंद करण्याचा ठराव घेतला. त्यापूर्वी, या पदाधिकाऱ्यांनी आधी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना आणि त्यानंतर लगेचच आमदार राधाकृष्ण विखे पाटलांना साकडे घातले. याबाबत जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांशी चर्चा करू, असे आश्वासन थोरात यांनी दिले आहे.

shirdi sanshtan
शिर्डी विमानतळ प्रश्नावर सुजय विखेंच्या प्रयत्नाला यश

भाविक कमी पोलिस अधिक

साईमंदिर खुले झाल्यापासून येथील वाहतूक शाखा एवढी जोमाने कामाला लागली आहे, की ब-याचदा रस्त्यावर भाविक कमी आणि वाहतूक पोलिस अधिक, असे चित्र दिसते. जाळ्यात मासे पकडावेत तशी भाविकांची चारचाकी वाहने आणि आजूबाजूच्या गावांतील शेतकरी आणि छोट्या व्यापा-यांच्या दुचाक्या अडवून, कुठले ना कुठले कारण दाखवून दंड आकारतात. ग्रामस्थांच्या वाहनांचे फोटो काढून ई-चलनाची उद्दिष्टपूर्ती करतात.

shirdi sanshtan
शिर्डी संस्थानवर अजित पवारांचे लक्ष : भाविकांना मिळवून दिल्या या सुविधा

लगेच दंडाची आकारणी

विशिष्ट पद्धतीने बॅरिकेड लावून, त्यात वाहन शिरले, की लगेच दंडाची आकारणी करतात. हा उच्छाद एवढा वाढला आहे, की नव्याने आलेले पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांना या पोलिस कर्मचा-यांकडची दंड पावती पुस्तके आणि ई-चलनचे मशिन काढून स्वतःकडे घ्यावे लागले. आजच्या ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते दीपक वारुळे यांनी एका भाविकाला फोन लावून ही लुटमारीची हकिगत सर्वांना ऐकवली. डॉ. एकनाथ गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवाजी गोंदकर, कमलाकर कोते, अशोक कोते, नीलेश कोते, ॲड. अनिल शेजवळ, प्रमोद गोंदकर, सुजित गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय जगताप आदी पदाधिकारी व ग्रामस्थ या सभेस उपस्थित होते.

shirdi sanshtan
Video: मोदी सरकारचं सलग 10वं बजेट

भाविकांकडे दहा हजार रुपयांची मागणी करण्याच्या प्रकाराची आपण चौकशी करू. त्यात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करू. यापुढे भाविकांची कुठलीही तक्रार येऊ देणार नाही.

- हिरालाल पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com