Abhishek Ghosalkar Case : गँगवॉरवर गोंधळ घालणारे साधूंची हत्या झाली तेव्हा कुठे होते ? सामंतांचा ठाकरेंवर 'बाण'

Uday Samant : मुंबईतील दहिसर येथील घटनेनंतर ठाकरे गटाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र, आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचा चांगलाच समाचार घेतला.
Uday Samant
Uday Samant Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: मुंबईतील दहिसर येथे झालेल्या गोळीबारानंतर राज्य सरकारला विरोधकांनी चांगलंच घेरलं आहे. ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत त्यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, आता उद्योगमंत्री उदय सामंतांनी ठाकरे गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे. (Uday Samant On Abhishek Ghosalkar Case and Thackeray group)

'दहिसरमधील गोळीबाराचा प्रसंग दुर्दैवी आहे. तो वैयक्तिक वादातून घडला आहे. ते 'उबाठा'मधील गँगवॉर असून, दुसऱ्याच्या माथी कशाला मारत आहात ? या प्रसंगावरून आता गोंधळ घालणारे पालघरमध्ये अनेक साधूंची हत्या झाली तेव्हा कुठे होते ?' असा सवाल सामंत यांनी विरोधकांना केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uday Samant
NCP Sharadchandra Pawar : पक्ष गेला, चिन्हही गेलं, तरी 'हम साथ साथ हैं'

‘दालन’ प्रदर्शनाच्या उद्‌घाटनावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सामंत म्हणाले, 'काल झालेल्या गोळीबाराच्या प्रसंगाचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र, जुने फोटो दाखवून त्याचे खापर मुख्यमंत्र्यांवर फोडणे आणि त्यांची बदनामी करणे योग्य नाही. चांगले झाले की, आम्ही केले आणि वाईट झाले की, मुख्यमंत्र्यांनी केले असे म्हणण्याची प्रवृत्ती सध्या वाढत असून ती बंद व्हावी.'

'गोळीबार करणाऱ्या आणि त्यात असलेल्या तिसऱ्या व्यक्तीवरही कारवाई केली जाणार आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यादृष्टीने कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत,' असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडली आहे. ती घटना दुर्दैवी आहे. मात्र, त्याबाबत गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे अथवा राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करणे योग्य नसल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Uday Samant
Pandharpur-Mangalvedha Politics : परिचारकांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली; ‘आवताडेंना मी आमदार केलं, पक्षासाठी मी दोनदा माघार घेतली’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com