Udayanraje Bhosale News : लोकनेत्यांच्या स्मारकासाठी उदयनराजेंचा पुढाकार; शंभूराज देसाईंना मदतीचा हात

Balasaheb Desai कै. बाळासाहेब देसाई यांचे सातारा मुख्यालयाच्या ठिकाणी साकारणाऱ्या नियोजित स्मारकाचा विषय विवादीत न होता तो एकमताने पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे.
Shambhuraj Desai, Udayanraje Bhosale
Shambhuraj Desai, Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : लोकनेते कै. बाळासाहेब देसाई यांचे साताऱ्यात प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहे. याकामी जरुर त्या संबंधितांशी चर्चा करून, स्मारकाचे ठिकाण एकमताने निश्चित केले जाईल. लोकनेते कै. बाळासाहेब देसाई यांच्या महान कार्यास साजेल असे स्मारक उभारण्यात येईल, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

लाेकनेते बाळासाहेब देसाई Balasahen Desai यांच्या स्मारकावरून वाद निर्माण झाला होता. पण आता खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी यामध्ये सर्व समावेशक भूमिका घेऊन या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार आहेत. उदयनराजे यांनी म्हटले की, राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री कै. बाळासाहेब देसाई यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात अत्यंत धाडसाने, तळमळीतून निर्णय घेऊन राज्यभरात लोकहिताची विविध सामाजिक कामे केली.

कै. बाळासाहेब देसाई यांचे एकूणच सामाजिक आणि राजकीय कार्य अत्यंत उत्तुंग होते. म्हणूनच त्यांना लोकनेते ही बिरुदावली समाजाने बहाल केली. अशा अलौकिक व्यक्तिमत्त्व लाभलेल्या कै. बाळासाहेब देसाई यांचे सातारा मुख्यालयाच्या ठिकाणी साकारणाऱ्या नियोजित स्मारकाचा विषय विवादीत न होता तो एकमताने पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे.

पालकमंत्री आणि लोकनेते कै. बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई यांच्यासह सर्व संबंधित लोकप्रतिनिधी, पक्षनेते, संघटना आदींशी विचारविनिमय करून स्मारकाचे ठिकाण सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. त्याकरिता जे काही करायला लागेल ते सर्वांच्या प्रयत्नामधून केले जाईल, असे उदयनराजे यांनी नमूद केले आहे.

Edited By : Umesh Bambare

Shambhuraj Desai, Udayanraje Bhosale
Satara Maratha Reservation : कुणबी शब्दाची लाज वाटते; शेती विकून चंद्रावर जावा...जरांगे पाटलांचा सल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com