Udayanraje Bhosale on Retirement: उदयनराजे यापुढे निवडणूक लढवणार नाहीत? स्वत:च दिली कबुली; म्हणाले...

Udayanraje Bhosale on Retirement : "मराठा आमदारांना पाडताय, पाडा..पाडा.. मी तर म्‍हणतो..
Udayanraje Bhosale on Retirement
Udayanraje Bhosale on Retirement Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : सातारा जिल्ह्यातील राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी, 'मी तर काय निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी कबुली स्वतःच दिली. ओबीसी मेळाव्‍यात मराठा समाजाचे दीडशे आमदार आम्‍ही पाडू, असे वक्‍तव्‍य केल्‍याबाबत विचारले असता त्यांनी अशी मिश्कीलपणे प्रतिक्रिया देत विरोधकांची खिल्ली उडवली. (Latest Marathi News)

Udayanraje Bhosale on Retirement
NCP-BJP : राष्ट्रवादी आमदाराच्या मतदारसंघातील समस्या सोडवली भाजपच्या माजी आमदाराने!

शनिवारी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची साताऱ्यात सभा झाली. सभेनंतर त्यांनी साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन राजगादीस अभिवादन केले. यावेळी उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच मराठा समाजाने मनोज जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन केले.

Udayanraje Bhosale on Retirement
Dharshiv News : जिल्हा BJP कार्यकारिणी निवडीला लागला चार महिन्यानंतर मुहूर्त; नव्या जुन्याचा घातला ताळमेळ

जालना येथे झालेल्‍या ओबीसी मेळाव्‍यात मराठा समाजाचे दीडशे आमदार आम्‍ही पाडू, असे वक्‍तव्‍य केल्‍याबाबत विचारले असता, उदयनराजे म्‍हणाले, "पाडा..पाडा.. मी म्‍हणतो. अजून काय बोलू. मी तर काय निवडणुकीला उभा राहणार नाही, असे ‍‍वक्तव्य करत त्‍यांनी त्‍या विधानाची खिल्‍ली उडवली. मात्र त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चांगली चर्चा झाली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले लोकसभेसाठी सातारा जिल्ह्यातून निवडणूक लढवणार की नाही याबाबत त्यांच्या या विधानाने चांगला संभ्रम निर्माण झाला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com