Satara : पैसा खाल्ला असता तर प्रोजेक्ट झाले असते का : उदयनराजेंचे प्रतिउत्तर

Satara Palika आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज खासदार उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीवर जहरी टीका केली होती.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : आम्ही पैसा खाल्ला असता तर सातारा शहरात प्रोजेक्ट झाले असते का. त्यांच्या काळात त्यांनी पैसे खाल्ले नाहीत, त्यामुळे प्रोजेक्ट झाले नाहीत. विचार करा पैसे कोण खाऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित करुन प्रत्येकाने बोलताना विचार करुन बोलावे, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले MP Udayanraje Bhosale यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह Shivendraraje Bhosale त्यांच्या नगरविकास आघाडीला दिला.

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज पालिकेत वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीवर टीकेची झोड उठवत, गेली पाच वर्षे खासदारांच्या सातारा विकास आघाडीतील नगरसेवकांनी सातारा पालिका लुटून खाल्ली, अशी जहरी टीका केली होती. त्याला खासदार उदयनराजेंनी प्रतिउत्तर दिले.

उदयनराजे म्हणाले, आम्ही पैसा खाल्ला. मग कोण नाही म्हणतंय, अगदी चढाओढ चालली होती. कारण पैसा खाल्ला असता तर प्रोजेक्ट झाले असते का. त्यांच्या नगरविकास आघाडीच्या सत्ता काळातील २५ ते ३० वर्षे त्यांनी पैसा खाल्ला नाही. त्यामुळे सातारा शहरात प्रोजेक्टस॒ झाले नाहीत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara : उदयनराजेंच्या आघाडीने सातारा पालिका लुटून खाल्ली : शिवेंद्रसिंहराजेंची टीका

त्यामुळे तुम्ही विचार करा पैसा कोणी खाल्ला आणि कोणी नाही. पैसा कोणी खाऊ शकत का, असा प्रश्न करुन उदयनराजे म्हणाले, पैसे खाल्ले असते तर विकास कामे झाली असती का. त्यांच्या काळात कामे झालं नाहीत, असे आम्ही म्हणायचे का. त्यामुळे बोलताना प्रत्येकाने विचार करुन बोलावे. देवाने तोंड दिले, जीभ दिली म्हणून त्यांनी अजून बोलावे, खुशाल बोलावे, असा सल्ला दिला.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara : माझं वय सांगायचा कुणी प्रयत्न केला, तर याद राखा : उदयनराजेंचा इशारा कोणाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com