Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या पत्राचं राष्ट्रपतींकडून दखल, राज्यपालांना हटवणार?

Udayanraje Bhosale : शिवाजी महाराजांचं अवमान करणाऱ्या ऱाज्यपालांना जे प्रश्न विचारत नाहीत, मूग गिळून गप्प बसतात, ते राज्यपालांएवढेच दोषी आहेत.
Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari
Udayanraje Bhosale, Bhagat Singh KoshyariSarkarnama

Udayanraje Bhosale : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करत राज्यपालांविरोधात निदर्शने झाली. शिवाजी महारांजांचे वंशज व खासदार उदयनराजे भोसले यांनी या बद्दल रोष व्यक्त करत राज्यपालांना हटवण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहले होते. आता या पत्राची दखल घेण्यात आल्याचे समजते आहे.

Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari
Girish Bapat : खासदार गिरीश बापटांच्या मनात नेमकं चाललयं तरी काय ?

उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांचं अवमान करणाऱ्या ऱाज्यपाल यांना तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी, अशा मागणीचे पत्र लिहले होते. आता राज्यपाल यांची केंद्रिय गृहविभाग चौकशी करण्यात असल्याची माहिती, स्वत: उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. शिवाजी महाराजांचं अवमान करणाऱ्या ऱाज्यपालांना जे प्रश्न विचारत नाहीत, मूग गिळून गप्प बसतात, ते राज्यपालांएवढेच दोषी आहेत, अशा शब्दात उदयनराजे यांनी हल्लाबोल केला.

Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari
Nitin Gadkari : शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांच वादग्रस्त विधान; गडकरी स्पष्टच बोलले...

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट तसेच राज्यातील अनेक नेत्यांनी आक्रमक होत राज्यपालांवर जोरदार टीका केली. राज्यपालांना हटवण्याची सर्वच पक्ष आणि संघटनांनी मागणी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com