
माढा लोकसभा मतदारसंघ ( Madha Lok Sabha Election 2024 ) महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyashil Mohite Patil ) यांनी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsingh Naik Nimbalkar ) यांना विरोध दर्शवत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपत पेच निर्माण झाला आहे,तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढ्याचा 'तिढा' सोडवला आहे. माढ्यातून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर ( Mahadev Jankar ) हे महाविकास आघाडीकडून लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांनी परभणी, माढा या दोन जागांची मागणी भाजपकडे केली होती. पण, भाजपकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पण, शरद पवारांनी वेळ साधत जानकरांना माढ्याची जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. जानकर महाविकास आघाडीबरोबर आल्यानं याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
"माझा आमदार फडणवीसांनी फोडला"
"शरद पवारांनी ( Sharad Pawar ) माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचं मी स्वागत करतो. पण, देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी माझा आमदार फोडला, तिकीट नाकारलं, हे जनतेला पटलं नाही. येणारी लोकसभा हा ट्रेलर आहे, खरा पिक्चर तर विधानसभेला दाखवणार," असा इशारा जानकरांनी भाजपला दिला आहे. ते एका प्रसारमाध्यमाशी संवाद साधत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"भाजपचं सरकार आणण्यासाठी आमचा वाटा"
जानकर म्हणाले, "महायुतीकडे दोन जागांची मागणी केली होती. पण, भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. महाविकास आघाडीकडे माढा, परभणी सांगलीच्या जागेची मागणी केली. लागोलाग शरद पवारांनी सकारात्मक असल्याचं सांगितलं. भाजपचं माझ्यावर प्रेम होतं. त्यांनी आम्हाला मंत्री केलं. मात्र, भाजपचं सरकार आणण्यासाठी आमचा वाटाही आहे."
"...तर लढाई अटीतटीची होईल"
"रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणार मोठा वर्ग आहे. माढ्यातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर रणांगणात असतील तर मला काहीच काळजी नाही. मी अडीच लाखांच्या मतांनी निवडून येणार. यासाठी रामराजे आणि विजयदादांचा आशीर्वाद पाहिजे. दोघांचा आशीर्वाद नसेल, तर लढाई अटीतटीची होईल," असं जानकरांनी सांगितलं.
"एबी फॉर्मवरील चिन्हावर निवडणूक लढणार"
"मी तुतारी किंवा घड्याळ चिन्हावर लढणार नाही. माझ्या एबी फॉर्मवर असलेल्या चिन्हावर मी निवडणूक लढणार आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या चिन्हावर लढा, असं शरद पवारांनी सांगितलं," अशी माहिती जानकरांनी दिली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.