Lanke On Ajitdada Statement : नीलेश लंके अजितदादांना भेटणार, महायुतीत धाकधूक वाढली...

South Nagar Lok Sabha election 2024 : नीलेश लंकेंनी निवडणुकीच्या 45 दिवसाच्या प्रचारावर भाष्य केले. निवडणुकीच्या निमित्ताने 45 दिवसांच्या प्रचारात बहुतांशी गावात गेलो. मी अनेक निवडणुका पहिल्या.
Nilesh Lanke-Ajit Pawar
Nilesh Lanke-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagar, 11 May : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या तीन दिवसांत राज्यातील दोन आमदारांना दम भरला. यात नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांचा समावेश आहे. 'नीलेश बेटा, तुझा बंदोबस्तच करतोच', 'तू किस झाड पत्ती है', असे पारनेर विधानसभा मतदारसंघात येऊन अजितदादांनी फटकारले होते. यावर नीलेश लंकेंनी मौन सोडले आहे. "अजितदादांना संपर्क करतो. निवडणूक होऊ द्या," असे नीलेश लंके यांनी म्हटले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी नगरमध्ये महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. कर्जत-जामखेडपाठोपाठ पारनेरमध्येही अजित पवारांची सभा झाली. पारनेर विधानसभा मतदारसंघ हा नीलेश लंकेंचा (Nilesh Lanke) बालेकिल्ला. अजित पवारांमळे नीलेश लंके राष्ट्रवादीत आले आणि तेथून निवडून आले. परंतु लोकसभेसाठी त्यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांकडे (Sharad Pawar) गेले आणि लोकसभा निवडणुकीचे उमेदवार झाले, त्यासाठी नीलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे अजित पवार पारनेरमध्ये येऊन नीलेश लंकेंच्या विरोधात काय बोलतात, याकडे लक्ष लागले. अजित पवारांनी दादा स्टाईल भाषणातून नीलेश लंकेंना पुरता धो-डाला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा पारा पारनेरमध्ये चांगलाच तापला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke-Ajit Pawar
PDCC Bank Case : PDCC बॅंक मॅनेजरवरील कारवाई ही निव्वळ धूळफेक, ‘ते’ फुटेज सार्वजनिक करा; रोहित पवार आक्रमक

अजितदादांनी सभेतून फटकारल्यानंतर नीलेश लंकेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "दादांना विचारणार आहे. फोन करणार आहे. दोन दिवसांत मतदान होईल. त्यानंतर त्यांना संपर्क करणार आहे. दादा सभेत कसे बोलले ते पाहा. काहींनी खालून चिठ्ठ्या दिल्या होत्या. त्यानंतर दादा बोलले. शेवटी एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्यावर त्यावेळेस उमेदवाराच्या बाजूने बोलणेच अपेक्षित असते", असे नीलेश लंकेंनी म्हटले आहे.

नीलेश लंकेंनी निवडणुकीच्या 45 दिवसांच्या प्रचारावर भाष्य केले. निवडणुकीच्या निमित्ताने 45 दिवसांच्या प्रचारात बहुतांशी गावात गेलो. मी अनेक निवडणुका पहिल्या. उमेदवार म्हणून जनतेत जातो, त्यावेळी जनतेची अपेक्षा असते की, उमेदवार आपला असला पाहिजे. आपली कामे त्याने केली पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी उमेदवार म्हणून उत्स्फूर्त स्वागत झाले. एकंदरच धनशक्तीविरुद्ध जनशक्ती, असे चित्र पाहायला मिळल्याचे नीलेश लंकेंनी सांगितले.

Nilesh Lanke-Ajit Pawar
PDCC Bank News : बँक उशिरा चालू ठेवणं पडलं महागात, निवडणूक आयोगानं वेल्ह्याच्या मॅनेजरवर केली मोठी कारवाई

प्रतिस्पर्धी उमेदवारावर बोलताना त्यांना अपयश दिसू लागल्याचा दावा नीलेश लंकेंनी केला. 'अपयश दिसू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागायची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी कामे केली असतील, स्वतःच्या कामावर मते मागणे अपेक्षित होते. ते सुद्धा झाले नाही. त्यामुळे त्यांना अपयश दिसू लागले आहे. ज्यावेळी माणसू दुसऱ्याचा आधार घेतो, त्यावेळी आपल्याकडे काहीच राहिलेले नसते'.

वास्तविक पाहाता कोणत्याही उमेदवाराने वैयक्तिक बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्यावर निवडणूक घेणे गरजेचे असते. पण ज्यावेळेस आपल्याकडे काही राहिलेच नसते. त्यावेळेस माणूस व्यक्तिगत टीका-टिप्पणी करतो. कुठल्या उमेदवाराला अपेक्षित नसते. माणूस जेव्हा खालच्या थरावर जातो, त्यावेळी त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली असते. तेच या निवडणूक धनशक्तीला दिसू लागल्याचा टोला नीलेश लंकेंनी लगावला.

Nilesh Lanke-Ajit Pawar
Madha Lok Sabha : माढ्याच्या विजयाची चावी पुन्हा माळशिरसच्या हाती; पण फलटण, माणमधील वाढलेली मतेही निर्णायक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com