Karad Politics : साहेबांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना मिळालाय खमका नेता... उंडाळकरांमुळे 3 तालुक्यात वाढणार बळ!

Udaysingh Undalkar joins NCP : काँग्रेसचे दिवंगत नेते, 7 टर्मचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा 19 एप्रिल रोजी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे.
Udaysingh Undalkar joins NCP
Udaysingh Undalkar joins NCPSarkarnama
Published on
Updated on

Karad Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभरातील आमदारांनी, नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ दिली. पण काही अपवाद राहिले. यात सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण आणि कोरेगाव तालुक्यातील बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे या नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहणे पसंत केले.

त्यामुळे या 3 तालुक्यात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद क्षीण राहिली होती. नेतेच नसल्याने सहाजिक या तालुक्यातील लोकांचाही राष्ट्रवादीकडे ओढा कमीच राहिला. याची सल अजित पवार यांना होती. अखेर अॅड. उदयसिंह उंडाळकर यांच्या माध्यमातून अजित पवार यांना शरद पवार यांच्या या बालेकिल्ल्यात खमका नेता मिळाला आहे.

Udaysingh Undalkar joins NCP
Karad Politic's : काँग्रेस नेत्याच्या मनातलं अखेर ओठावर आलं : ‘बाळासाहेबांच्या त्रासाला कंटाळून आम्ही भाजप आमदाराला निवडून आणलं; पण ‘सह्याद्री’त त्यांनी...’

काँग्रेसचे दिवंगत नेते, 7 टर्मचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा 19 एप्रिल रोजी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. त्यांच्या प्रवेशाने साताऱ्याच्या दक्षिण भागातील कराड दक्षिण, उत्तर व पाटण या विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या गटाला नवा चेहरा मिळणार आहे.

विलासकाका उंडाळकर यांच्या पश्चात उदयसिंह उंडाळकर यांनी काँग्रेस पक्षात आपला वेगळा ठसा उमटवला. पक्षानेही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राज्य पातळीवरील जबाबदारी दिली. त्यांना प्रदेश चिटणीस बनवले. स्थानिक राजकारणातही रयत सहकारी साखर कारखाना, कोयना बँक, कोयना दूध संघ, जिल्हा बँक या संस्थांच्या माध्यमातून त्यांचा गट आजही जिवंत ठेवला आहे.

Udaysingh Undalkar joins NCP
Karad Politics : पृथ्वीराज चव्हाणांना दुसरा धक्का देण्यासाठी अतुल भोसलेंची फिल्डिंग; यंत्रणा लागली कामाला

कराड, पाटण तालुक्यात या संस्थांच्या माध्यमातून उंडाळकर गटाचा निर्णायक होल्ड आहे. परंतु या गटाला आता सत्तेच्या राजकीय पाठबळाची गरज भासू लागली. ही राजकीय पाठबळाची गरज पूर्ण करण्यासाठी उदयसिंह पाटील यांनी इतर पक्षात जाण्यासंदर्भात विचार सुरु केला. त्याचवेळी फुटीनंतर अजित पवारांकडे या पट्ट्यात गर्दी जमवणारा नेता नव्हता.

या दोन्ही गरजा ओळखून 19 एप्रिल रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत उदयसिंह पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. आता या भागाला पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवण्याच्या प्रयत्नांना कितपत यश येणार? जिल्ह्यात, तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचे शिवधनुष्य अॅड. उदयसिंह पाटील पेलवणार का? याचीच चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com