Delhi News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून (BJP) जय्यत तयारी केली जात आहे. ४८ खासदार देणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यावर भाजपकडून विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. भाजपने लोकसभेसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ चा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) याच संदर्भाने क्लस्टर बैठका घेत आहेत. (Latest Marathi News)
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महाराष्ट्र राज्यातील खासदारांची आज (दि. ८ ऑगस्ट) बैठक पार पडणार आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मोदींच्या या क्लस्टर बैठका सुरू आहेत. आज सायंकाळी सहा वाजता या बैठकीचे आयोजन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन केले आहे. संसदेच्या अधिवेशनामुळे महाराष्ट्रातील सर्व खासदार राजधानी दिल्लीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्लस्टर बैठका होत आहे. एनडीएमधील महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील एकूण 48 खासदारांची एकत्रितपणे बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी मोदीयांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, मंत्री राजनाथ सिंह यांची या बैठकीसाठी उपस्थिती राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.