
P N patil Group News : विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांचा पराभव झाला. निसटत्या मतांनी पराभव झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या हा पराभव ज्वारी लागला. मात्र त्याला तीन ते चार महिने उलटताना पी एन पाटील गटाच्या ताब्यात असलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक लागली.
विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी पी एन पाटील गटाचे खंदे कार्यकर्ते जिद्दीला पेटले. कौलकर यांच्या आघाडीने घाम फोडला असला तरी कार्यकर्त्यांनी राहुल पाटील यांना या विजयातून उभारी दिली आहे.
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी वर्चस्व राखले. दिवंगत आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली या शिक्षण महामंडळाची वाटचाल सुरू राहिली आहे. या निवडणुकीतही सभासदांनी त्यांच्यावरचा ठाम विश्वास दाखवून दिला आहे. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलावर ही सभासदांनी विश्वास दाखवला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या लढतीत सत्ताधाऱ्यांना यश मिळाले असले तरी पुढील निवडणुकीत कडवे आव्हान समोर असणार आहे.
दीड ते दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील आणि दिवंगत नेते आमदार पी एन पाटील यांच्यात झालेल्या समझोता एक्सप्रेस नंतर कारखान्याच्या निवडणुकीत भोगावती राखण्यात यश मिळाले. त्याचा फायदा कारखान्याच्या निवडणुकीत झाला.
विधानसभा निवडणुकीत झाला. यंदा भोगावती मध्ये समेट घडवून आणण्यात राहुल पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांना देखील यश आले. जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील यांनी आपल्याला मिळालेली जागा ही महायुतीचे नेते आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या चिरंजीव धैर्यशील डोंगळे यांना दिल्याने विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला. राधानगरीतील आव्हान या जागेमुळे झोपवले. मात्र विरोधकांनी दिलेले कडवे आव्हान लक्षणीय आहे.
दरम्यान या निवडणुकीत दिवंगत आमदार पीएन पाटील यांच्या पश्चात त्यांचे पुत्र राहुल पाटील यांनी नेतृत्व केले होते. विधानसभा निवडणुकीत अत्यंत कमी मत फरकाने पराभव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील निराशा होती. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नसल्याने मतदार संघात वर्चस्व ठेवण्यासाठी या निवडणुकीकडे पाहिले जात होते.
भोगावती सहकारी साखर कारखाना आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून करवीर आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात पाटील गटाचे वर्चस्व या दोन निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध होत असते. शिवाय त्याला मतदारसंघातील बळ मिळत असल्याने पी एन पाटील गट तितका मजबूत होत होता. मात्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्याचा फटका बसला होता. मात्र या निवडणुकीत झालेल्या विजयामुळे राहुल पाटील यांना मतदार संघात उभारी मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.