सोलापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये होते, तर उद्धव ठाकरे रडे आहेत. नैतिकतेच्या बाता उद्धव ठाकरे यांना शोभत नाहीत. ज्या दिवशी ४० आमदार सोडून गेले, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंचा पराभव झाला, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. (Uddhav Thackeray was defeated on the same day : Chandrashekhar Bawankule)
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बेईमान का झाले. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं प्रत्येक काम केलं आहे. एक वेळ भाजपच्या कार्यकर्त्यांची कामे केली नाहीत; पण उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं प्रत्येक काम मातोश्रीपर्यंत पोहोचवलं आहे. अनेक उपकार केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची डिग्री काढली जाते. पावडर लावली, अशी वक्तव्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शोभत नाहीत. ही माणसं बेताल झाली आहेत. न्यायालयाविरुद्ध बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध बोलतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरुद्ध बोलतात. त्यांना यापुढे त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीमुळे, महाविकास आघाडीच्या चुकीच्या निर्णयामुळे लांबणीवर पडल्या आहेत. चुकीची प्रभागरचना, चुकीच्या पद्धतीने सदस्य संख्या वाढवणे असे प्रकार केले आहेत, त्यामुळे या निवडणुका पुढे गेल्या आहेत. मात्र, येत्या डिसेंबरपर्यंत निवडणुका होतील, असं आम्हालाही वाटतंय.
सोलापूर शहराचा रखडलेला पाणीपुरवठा आणि विमानतळाचा प्रश्न यासंबंधी आपण निश्चित लक्ष घालू. हा विषय नक्की कशामुळे आणि कुठे आढले आहे, याविषयी कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा करू, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.
न्यायालयाचा निकाल स्वतःच्या सोयीने लावून वारंवार चुकीचं जनतेमध्ये सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून न्यायालयाचा अवमान होत आहे. भाजप या सर्व क्लिप आणि माहिती गोळा करून न्यायालयाच्या हे निदर्शनास आणून देईल, असा गर्भित इशाराही बावनकुळेंनी ठाकरेंना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.