Rajan Patil Vs Umesh Patil : उमेश पाटलांचे राजन पाटलांना पुन्हा चॅलेंज; ‘नेतृत्वाला दुखवायचे नव्हते म्हणून शांत होतो; पण...’

Additional Tehsil office Issue : मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर झाले आहे. अनगर येथे अतिरिक्त तहसील कार्यालय करण्यास राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवला आहे.
Umesh Patil-Rajan Patil
Umesh Patil-Rajan PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 July : अतिरिक्त तहसील कार्यालयावरून मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील दोन नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

आमच्या नेतृत्वाला आम्हाला दुखवायचे नव्हते, त्यामुळे आम्ही एवढे दिवस शांत होतो. पण, आता आम्ही उघडपणे विरोधात बाहेर पडलो आहोत, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधात पुन्हा एकदा लढाईचे रणशिंग फुंकले आहे.

मोहोळ तालुक्यातील अनगर (Angar) येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर झाले आहे. अनगर येथे अतिरिक्त तहसील कार्यालय करण्यास राष्ट्रवादीचे उमेश पाटील (Umesh Patil) यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थित आज (ता. २७ जुलै) मोहोळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

या सर्वपक्षीय नेत्यांनी मोहोळमध्ये अनगरमधील अतिरिक्त तहसील कार्यालयास विरोध दर्शविला आहे. काहीही झाले तरी अनगर येथे तहसील कार्यालय होऊ नये, अशीच भूमिका बंदमध्ये सहभागी झालेल्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे अनगर येथे मंजूर झालेल्या अतिरिक्त तहसील कार्यालयाचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Umesh Patil-Rajan Patil
Baba Mistry : भाजपच्या सहकार मंत्र्यांना आव्हान देणारे बाबा मिस्त्रींनी विधानसभेसाठी दंड थोपटले

अतिरिक्त तहसील कार्यालयावरून उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, मोहोळ तालुक्यातील शेटफळ, नरखेड, पेनूर भागातील लोकांबद्दल अनगरच्या नेत्यांना आकस आहे, त्यामुळे या भागातील लोकांनी अनगरला नाक घासत यावे, यासाठीच हे अतिरिक्त तहसील कार्यालय अनगर येथे मंजूर करण्यात आले आहे.

अनगर येथे मंजूर करण्यात आलेले तहसील कार्यालय रद्द करावे; अन्यथा विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही उमेश पाटील यांनी आपल्याच सरकारला दिला आहे.

Umesh Patil-Rajan Patil
Chandrakant Patil : ‘दादा, क्या कर रहे हो...?’; अमित शाहांचा मध्यरात्री दोनला चंद्रकांत पाटलांना फोन

मी आणि अनगरकर एकाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत. पण ही मंडळी स्वतःच्या सुरक्षततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आलेले आहेत. त्यांना अजित पवारांबद्दल कुठलीही अस्था नाही. अनगरकर हे सगळीकडेच संधान ठेवून आहेत. भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडेही त्यांनी आपले संधान बांधलेले आहे. वेळप्रसंगी पलटी मारायची तयारीही त्यांनी ठेवलेली आहे, असा दावाही उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर नाव न घेता केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com