Baba Mistry : भाजपच्या सहकार मंत्र्यांना आव्हान देणारे बाबा मिस्त्रींनी विधानसभेसाठी दंड थोपटले

Assembly Election 2024 : मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी एकही मातब्बर नेता तयार नव्हता. त्या वेळी बाबा मिस्त्री यांनी देशमुखांना दिलेली लढत सोलापूर जिल्ह्यात लक्षवेधी ठरली होती.
Baby Mistry
Baby MistrySarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 July : मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसची खिंड लढवणारे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी विधानसभेसाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. दक्षिण सोलापूरमधून विधानसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे.

बाबा मिस्त्री (Baba Mistry) यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसचे (Congress) सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवनात उमेदवारीची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. या वेळी मिस्त्री यांच्यासोबत मिस्त्री यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, बाबा मिस्त्री यांच्या अगोदर या मतदारसंघातून इच्छुक असणारे माजी आमदार दिलीप माने यांनीही काँग्रेसकडे विधानसभेची उमेदवारी मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. याशिवाय इतरही अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. या सर्वांतून काँग्रेसच्या उमेदवारी माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे लक्ष असणार आहे.

बाबा मिस्त्री यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात लढत दिली होती. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार अवघ्या काही दिवसांत बाबा मिस्त्री यांनी भाजपचे सुभाष देशमुख यांच्या विरोधात तब्बल 58 हजार मते घेतली होती, त्यावेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी एकही मातब्बर नेता तयार नव्हता. त्या वेळी बाबा मिस्त्री यांनी देशमुखांना दिलेली लढत सोलापूर जिल्ह्यात लक्षवेधी ठरली होती.

Baby Mistry
Chandrakant Patil : ‘दादा, क्या कर रहे हो...?’; अमित शाहांचा मध्यरात्री दोनला चंद्रकांत पाटलांना फोन

मागील निवडणुकीत दक्षिण सोलापूरमधील जनतेचा प्रतिसाद पाहून बाबा मिस्त्री यांनी गेल्या काही महिन्यांपासून मतदार संघात संपर्क वाढवला होता, त्यातून त्यांना मतदारसंघात सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला. त्यातून बाबा मिस्त्री यांनी काँग्रेस पक्षाकडे विधानसभा उमेदवारीची मागणी केली आहे. मिस्त्री यांनी सोलापूर महापालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पीटल) ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या अडीअडचणीच्या सोडविण्यासाठी बाबा मिस्त्री कायम पुढे असतात. सर्वांशी असणार संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. अल्पसंख्याक समाजातून येऊन दक्षिण सोलापूरसारख्या मतदार संघात भाजपला जोरदार टक्कर देणारे बाबा मिस्त्री यांची आमदारकी गेल्यावेळी थोडक्यात हुकली होती, त्यामुळे त्यांनी आमदारकीसाठी पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे.

Baby Mistry
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंनंतर दोन्ही उपमुख्यमंत्री तातडीने दिल्लीत दाखल; अमित शाहांबरोबर रात्री बैठक!

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. माजी आमदार दिलीप माने, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, उद्योजक महादेव कोनगुरे हेही इच्छुक आहेत. मात्र, खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com