Yashwant Mane : यशवंत मानेंचा मोठा गौप्यस्फोट; ‘राजन पाटील अन॒ माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटलांनी एका महिलेला 50 लाखांची ऑफर दिली’

Mohol Political News : माजी आमदार यशवंत माने यांनी गौप्यस्फोट केला की उज्ज्वला थिटे यांना उमेश पाटील आणि राजू खरे यांनी राजन पाटीलविरुद्ध आरोप करण्यासाठी ५० लाखांची ऑफर दिली होती.
Umesh Patil-Rajan Patil-Yashwant Mane
Umesh Patil-Rajan Patil-Yashwant ManeSarkarnama
Published on
Updated on
  1. माजी आमदार यशवंत माने यांनी मोठा आरोप केला आहे की उज्ज्वला थिटे यांनी त्यांच्यावर आणि राजन पाटील यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी ₹५० लाखांची ऑफर मिळाल्याचे स्वतः त्यांना सांगितले.

  2. माने यांच्या म्हणण्यानुसार, थिटे यांनी त्यांच्याकडून त्यांच्या मुलासाठी नवी इनोव्हा गाडी आणि ₹१० लाखांची मागणी केली होती, जेणेकरून त्या त्यांच्यावर आरोप करणार नाहीत.

  3. मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माने, राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील जुना वाद पुन्हा पेटला असून, या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

Solapur, 08 November : माझ्या पुतण्याचं पुण्यात एक कन्स्ट्रक्शन कंपनीचं ऑफीस आहे. त्या ऑफीसमध्ये ता. 25 ऑक्टोबर 2024 रोजी उज्ज्वला थिटे आणि त्यांचा मुलगा मला भेटण्यासाठी दुपारी चारच्या सुमारास आले होते. त्यांनी मला सांगितले की, ‘यशवंत माने, राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर सडकून आरोप करायचे, त्यासाठी मला उमेश पाटील आणि राजू खरे यांनी 50 लाख रुपयांची ऑफर दिली आहे’ हे मी खोटं बोलत नाही. तुम्ही कोणीही त्या थिटे नावाच्या महिलेला विचारू शकता, असा गौप्यस्फोट माजी आमदार यशवंत माने यांनी केला.

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजन पाटील (Rajan Patil) विरुद्ध उमेश पाटील वाद पुन्हा पेटला आहे. मोहोळमधील कार्यक्रमात बोलताना माजी आमदार माने यांनी पुन्हा एकदा उमेश पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यशवंत माने (Yashwant Mane) म्हणाले, मोहोळ तालुक्यातील काहींच्या भूलथापांना दुर्दैवाने मतदारसुद्धा भुलले. मी तुम्हाला एक गोष्ट बोलतो, बारा महिन्यांपूर्वी घडलेली ही गोष्ट. मध्यंतरी त्यांच्या स्टेजवरून एका भगिनीने राजन पाटील आणि माझ्यावर आरोप केले. त्यांचे नाव उज्ज्वलाताई थिटे. छोटी माणसं किती बोलतात, खोटं बोलण्यासाठी काय करतात. म्हणजे ती जी टिम होती, त्याचे ज्वलंत उदाहारण मी तुम्हाला सांगतो.

उज्ज्वला थिटे यांनी ऑफरबाबत सांगितल्यावर मी त्यांना विचारले की, माझ्याकडे तुम्ही कशासाठी आलात. त्यावर त्यांनी सांगितले की, आता तुमच्यावर काय बोलायचं. म्हणून मी आले आहे की, तुम्ही मला काही तरी द्या. म्हणजे मी तुमच्यावर बोलणार नाही. मी म्हटलं, माझ्याकडं आहेच काय, माझ्यावर बोलण्यासारखं आहेच काय तुमच्याकडं. त्यावर तिने सांगितले की बोलणार काही तरी, पुढची माणसं ऐकतात, असा दावाही यशवंत मानेंनी केला.

Umesh Patil-Rajan Patil-Yashwant Mane
Shivendra Raje : मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरेंना बॅटिंग करायला नव्हे; विकेट काढायला सोलापुरात पाठवलंय : शिवेंद्रराजेंची गुगली

ते म्हणाले, आमच्यावर आरोप न करण्यासाठी मी काय केले पाहिजे, अशा विचारणा मी उज्ज्वला थिटे यांना केला. तेव्हा तिने सांगितले की, माझ्या मुलासाठी नवी कोरी इनोव्हा गाडी द्या. ती इनोव्हा गाडी चालवण्याठी अकाउंटवर दहा लाख रुपये पाठवा, अशी मागणी थिटे यांनी केली. मी हे खोटं सांगत नाही. विठ्ठलाकडे तोंड करून सांगतो, हा यशवंत माने खोटं कधी बोलत नाही.

हे सर्व मी एक वर्षानंतर बोलतोय. मी त्याचवेळी बोललो असतो तर म्हटल गेलं असतं की, एका महिला भगिनीची तुम्ही इज्जत काढताय, आरोप करताय. आता कुठं माझं इलेक्शन नाही, हे मी तुम्हाला एका वर्षांनंतर सांगतोय. मोहोळ मतदारसंघात खोटं बोलणाऱ्यांची एक टीम आहे. खोट विकण्यासाठी ही माणसं पैसे देऊन कामाला लावतात. तुम्ही उज्ज्वला थिटे यांना जाऊन विचारा की, तुम्ही यशवंत माने यांच्या पुण्यातील ऑफीसमध्ये गेला होता की नाही?, तुम्ही इनोव्हा गाडी, दहा लाखांची मागणी केली होती का? आणि तुम्हाला पन्नास लाखांची ऑफर होती का?

Umesh Patil-Rajan Patil-Yashwant Mane
Pandharpur Politic's : पंढरपूरच्या राजकारणाला कलाटणी; मनसे नेत्याच्या पुढाकाराने विठ्ठल परिवारात मनोमिलन

Q1. यशवंत माने यांनी कोणावर आरोप केला?
A1. त्यांनी उज्ज्वला थिटे आणि उमेश पाटील यांच्यावर आरोप केला की त्यांनी खोटे आरोप करण्याचा कट रचला होता.

Q2. उज्ज्वला थिटे यांनी माने यांच्याकडे काय मागणी केली होती, असा दावा आहे?
A2. त्यांच्या मुलासाठी नवी इनोव्हा गाडी आणि ₹१० लाख रुपये देण्याची मागणी केली होती.

Q3. या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे?
A3. मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्या वादाशी हे प्रकरण संबंधित आहे.

Q4. माने यांनी हे आरोप आत्ता का केले?
A4. त्यांनी सांगितले की त्या वेळी निवडणूक असल्याने महिला बदनाम करण्याचा आरोप झाला असता, म्हणून एक वर्षानंतर ते आता बोलत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com