

Sangali News: पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठी हाय व्होल्टेज समजली जाणारी उरण ईश्वरपूर नगरपालिका निवडणूक अत्यंत अटीतटीची होत चालली आहे. जसे मतदानाचे दिवस जवळ येत आहेत तस तसे उरण ईश्वरपूरच्या निवडणुक आखाड्यात आरोप-प्रत्यारोपांचा जाळ आणि धूर उडत आहे. महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
मतदानापूर्वीच ही निवडणूक पोलीस चौकीपर्यंत गेली असताना आता थेट मुख्यमंत्रीच उरण ईश्वरपूरच्या मैदानात उतरणार आहेत. येत्या रविवारी त्यांची सभा महायुतीच्या प्रचारा निमित्ताने होणार आहे. उरण ईश्वरपूर निवडणुकीच्या रणांगणात माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात महायुती एकवटली आहे.
भाजप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह स्थानिक आघाडी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात रान उठवले आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांच्यासह उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच सभा होणार आहे. आतापर्यंत महायुतीच्या सभेला उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम यासह अनेक मंत्र्यांनी प्रचारार्थ उडी घेतली आहे. शिवाय सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांचे विशेष लक्ष या नगरपालिकेकडे आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, नेते चिमण डांगे, राष्ट्रवादीचे नेते निशिकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता थेट मुख्यमंत्री उरण ईश्वरपूरच्या नगरपालिका निवडणुकीत प्रचारासाठी येणार आहेत. रविवारी 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील गांधी चौक येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होणार आहे. या संदर्भातील माहिती महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.