Sharad Pawar : शरद पवारांच्या नेत्याला भलताच ‘कॉन्फिडन्स’, म्हणाले “माझ्या विरोधात..."

Malshiras Assembly constituency : माळशिरसमधून राम सातपुते हे भाजपचे आमदार आहे. मात्र, लोकसभेतील पराभवापासून ते सक्रिय नाहीत. त्यामुळे मी निवडून येईल, असा विश्वास उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Malshiras News: माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( शरदचंद्र पवार ) उत्तम जानकर यांचं तिकीट ‘फिक्स’ आहे. राष्ट्रवादीचे ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जानकर यांची उमेदवारी लोकसभेला घोषित केली होती. त्यामुळे जानकर हे विधानसभेच्या कामाला लागले आहेत. पण, माझी निवडणूक बहुधा बिनविरोध होईल, असा ‘कॉन्फिडन्स’ जानकर यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माळशिरसचे आमदार राम सातपुते ( Ram Satpute ) हे मतदारसंघात ‘सक्रिय’ नाहीत. त्यामुळे राम सातपुते हे पुन्हा निवडणूक लढणार का? हा सवाल उपस्थित होत आहे. यातच राम सातपुते हे विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून येणार नाहीत, असा दावा उत्तम जानकर यांनी केला आहे.

उत्तम जानकर ( Uttam Jankar ) म्हणाले, “माळशिरमधून माझ्याविरोधात अद्याप कुणीही उमेदवार नाही. निवडणुकीत उमेदवार येईल, असंही वाटत नाही. राम सातपुते तर उमेदवार म्हणून कदापीही येणार नाहीत. माझ्याविरोधात भाजपला एकही उमेदवार आजतागायत मिळाला नाही. माझी निवडणूक बहुधा बिनविरोध होईल.”

Sharad Pawar
Uddhav Thackeray : भाजपचा बडा नेता ठाकरेंनी फोडला, CM शिंदेंच्या मंत्र्याविरुद्ध लढणार?

शहाजीबापू निवडणुकीतून माघार घेतील...

उत्तमराव जानकर यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघावर भाष्य करत आमदार शहाजीबापू पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “दीपकआबा पाटील यांच्या माध्यमातून सांगोल्यात एक उमेदवार आला आहे. दीपकआबांच्या पाठीमागे पुणे, मुंबई आणि सांगोल्याची लोक उभी आहे. हे बघितल्यानंतर शहाजीबापू निवडणुकीत 100 टक्के माघार घेतील,” असं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com