महादेवीबाबत मोठी बातमी : जनरेट्यापुढे वनतारा झुकले? माफीनाम्यानंतर दुसऱ्यांना टीम कोल्हापुरात दाखल

Mahadevi May Return to Kolhapur Soon : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीण एक आठवड्यांपूर्वी गुजरात येथील जामनगरच्या वनतारामध्ये हालवण्यात आली होती. ज्यानंतर कोल्हापुरमध्ये संतापाची लाट उसळली होती.
Vanatara Team to visit Kolhapur
Vanatara Team to visit Kolhapursarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. नांदणी, कोल्हापूर येथील महादेवी हत्तीण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुजरातच्या जामनगरमधील वनतारामध्ये हलवण्यात आली.

  2. नागरिक, सामाजिक संघटनांनी ‘माधुरी ब्रिंग बॅक’ चा नारा देत शांततामय आंदोलन केलं, जिओ बॉयकॉटच्या माध्यमातून निषेध नोंदवला.

  3. जनभावना लक्षात घेऊन वनताराने माफी मागितली असून टीम पुन्हा कोल्हापुरात दाखल झाली असून हत्तीण परत आणण्याबाबत चर्चा सुरू आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये हालवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही हत्तीण एक आठवड्यांपूर्वी गुजरात येथील जामनगरच्या वनतारामध्ये पाठविण्यात आली होती. ज्यानंतर कोल्हापुरसह राज्यभर याचा विरोध झाला. सोशल मिडियावर देखील यावरून संपात व्यक्त केला जात होता. कोल्हापुरात तर नागरिक, विविध सामाजिक संघटनांनी शांततामय पद्धतीने आंदोलन उभारले. तर आक्रमक नागरिकांनी जिओ बॉयकॉट आणि माधुरी ब्रिंग बॅकचा नारा दिला. यानंतर याची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील घेतली आहे. त्यांनी महादेवीला परत आणण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाईल अशी ग्वाही दिली आहे. तर जनभावना पाहता या लढ्यात वनताराही सहभागी असल्याचे त्यांनी सांगत सर्व जनतेची माफी मागितली. या माफीनाम्यानंतर वनताराची टीम पुन्हा एकदा कोल्हापुरात दाखल झाली असून महाराज स्वामी यांच्यासोबत ते करणार चर्चा आहेत. यामुळे महादेवीला कोल्हापुरात आणण्यात येणार अशा चर्चेला उत आला आहे.

माधुरी हत्तीणीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता ती पुन्हा कोल्हापुरला परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल तर या प्रयत्नात वनताराही सहभागी असेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर आज (ता.6) पुन्हा एकदा नवताराची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे. ही टीम नांदणी मठातील महाराज स्वामी यांच्यासोबत करणार चर्चा करणार आहे. तर यासाठी दसरा चौक येथील दक्षिण जैन सभेचे दिगंभर जैन बोर्डिंग येथे तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आली आहे.

Vanatara Team to visit Kolhapur
Mahadevi Elephant: कोल्हापुरकरांसमोर 'वनतारा' झुकणार? थेट CM फडणवीसांनी लक्ष घातलं, आता महादेवी परतणार?

या बैठकीला या बैठकीला वन ताराचे सीईओ विहान करणी, नांदणी जैन भट्टारक भटारक स्वामी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, मठाचे सचिव सागर शंभू शेटे, कृष्णाराज महाडिक यांच्यासह रायबाग मठाचे विश्वस्त देखील उपस्थित आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्ती एक आठवड्यांपूर्वी गुजरात येथील जामनगरच्या वनतारामध्ये पाठवण्यात आली होती. यानंतर हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरकरांनी कंबर कसली होती. त्यासाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरले होते. तसेच सत्ताधारी खासदार आणि आमदारांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर मुंबईत देखील बैठक झाली. ज्यात वनताराचे अधिकारीही उपस्थुत होते.

आता सुरू असलेल्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीच्या संदर्भातील बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला जातो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुंबईत झालेल्या बैठकीत वनताराने हत्तीणीला कोल्हापुरात परत आणत तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असे म्हटले होते. तसेच एका निवेदनात वनताराने, “जैन समुदाय आणि कोल्हापूरकरांच्या भावना आम्हाला समजतात आणि आम्ही त्या मानतो. आमचा सहभाग न्यायालयीन आदेशापुरता मर्यादित असूनही, जर आमच्या कृतीमुळे कोणाला दुःख झाले असेल, तर आम्ही मनापासून क्षमा मागतो. मिच्छामी दुक्कडम.” असे म्हटले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा वनतारीची टीम कोल्हापुरात आल्याने महादेवी लवकरच कोल्हापुरात येईल अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दरम्यान याच्याआधी महादेवी हत्तीणीवरून राज्यभर पडसाद उमटू लागल्यानंतर वनतारा हत्ती संवर्धन केंद्राची टीम कोल्हापुरात चर्चेसाठी आली होती. त्यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशिल माने यांनी वनतारा टीमला कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. यामध्ये वनतारा सीईओ विहान करणी, जय पेंढारकर, साहिल शेख, अजित कुमार धनी राम सरोज, विजय शितोळे यांचे शिष्टमंडळ कोल्हापुरला भेट देऊन हत्तीला परत नांदणीत सोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.

Vanatara Team to visit Kolhapur
Mahadevi Elephant : पेटाचे धक्कादायक आरोप! हत्तीणाचा वापर भीक मागण्यासाठी केला गेला?नियंत्रणासाठी धातूच्या अंकुशाचा वापर झाला

FAQs :

प्रश्न 1: महादेवी हत्तीण कुठे हलवण्यात आली होती?
उत्तर: महादेवी हत्तीण गुजरातच्या जामनगर येथील वनतारामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हलवण्यात आली होती.

प्रश्न 2: कोल्हापुरातील नागरिकांचा यावर काय प्रतिसाद होता?
उत्तर: कोल्हापुरातील नागरिकांनी ‘माधुरी ब्रिंग बॅक’ आंदोलन केलं आणि सोशल मीडियावर #BoycottJio ट्रेंड केला.

प्रश्न 3: राज्य सरकारची यावर काय भूमिका आहे?
उत्तर: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालत सुप्रीम कोर्टात जाण्याचे आश्वासन दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com