Election Tender Fraud : सोलापुरात निवडणूक कामांत भ्रष्टाचार? : टेंडर न काढताचा दिला वाहनांचा ठेका, अधिकाऱ्यांना हिशेब देता येईना...

Solapur Corporation Election 2026 : सोलापूर महापालिका निवडणूक खर्चात २ कोटी ११ लाखांची बिले स्थायी समितीची मान्यता न घेता अदा केल्याचे प्रकरण ताजे असताना, टेंडरशिवाय वाहन ठेका दिल्याचे उघड झाले.
Solapur Corporation
Solapur CorporationSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 August : सोलापूर महापालिका निवडणूक खर्चातील आर्थिक व्यवहारांवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी बाब सुनावणीत पुढे येत आहे. अधिकाऱ्यांनी स्थायी समितीची मान्यता न घेता २ कोटी ११ लाखांची बिले परस्पर अदा केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता टेंडर न करताच वार्षिक ठेकेदाराला थेट वाहनाचा ठेका दिल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी नगरसेवकांनी महिनाभरापूर्वी तक्रार केली असून आतापर्यंत दोन वेळा सुनावणी झाली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना हिशेब देता आलेला नाही, त्यामुळे निवडणुकीच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा संशय आणखीच बळावत चालला आहे.

सोलापूर महापालिकेच्या २०२५-२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या खर्चाच्या बिलांवर उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक मंजिरी किल्लेदार, अर्चना वडनाल, श्रद्धा पवार, सत्यजित वाघमोडे यांनी आक्षेप घेत आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेवकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने समिती स्थापन केली आहे.

या समितीसमोर ता. ७ ऑगस्ट आणि २४ ऑगस्ट दोन वेळा सुनावणी झाली आहे. पहिल्या सुनावणीत उपमहापौर देवकर यांच्यासह नगरसेवकांनी निवडणुकीच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेपासून झालेल्या कामांची दिवसनिहाय तपशीलवार माहिती मागितली.

Solapur Corporation
BJP corporator : भाजप नगरसेविकेने शाळेसाठी आरक्षित जागेवर बांधले घर : सोलापुरात खळबळ,महापालिका प्रशासनाकडून चौकशी सुरू

यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना तसेच स्थायीची मान्यता न घेता दोन कोटी ११ हजार रुपयांचे बिले ठेकेदाराला दिल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (ता. २४ ऑगस्ट) झालेल्या सुनावणीदरम्यान निवडणुकीच्या काळात टेंडरविनाच वाहनाचा ठेका रणजित टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीला देण्यात आल्याचे समोर आले आहे.

Solapur Corporation
Mohite Patil : मोहिते पाटलांच्या भूमिकेवर ठरणार सोलापूर डीसीसीच्या निवडणुकीची चुरस; विजयदादांच्या जागेवर येणार रणजितदादा...

वाटाघाडीसाठी निविदा समितीची बैठक घेण्यात आली. मात्र त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्यात आल्या नसल्याचे दिसून आले. याबाबतची तपशीलवार माहिती द्यावी, अशी मागणी उपमहापौरांसह नगरसेवकांनी केली आहे. मात्र, या कामांचीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे संबंधित अधिकारी यांनी सुनावणीदरम्यान सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com