Solapur Crime : श्रीगोंद्याच्या विसापूर जेलमधून पळालेल्या कैद्याचा डाव वेळापूर पोलिसांनी उधळला : मूळगावी पोचण्याआधीच मुसक्या आवळल्या

Velapur Police News : विसापूर खुल्या कारागृहातून पसार झालेला खुनातील कैदी मूळगावी मळोलीला येणार असल्याची माहिती मिळताच वेळापूर पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने पकडले.
Velapur Police
Velapur PoliceSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 07 August (दिनेश माने देशमुख) : अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला एक कैदी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पसार झाला होता. तो माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील मूळगावी मळोली येणार असल्याची माहिती मिळताच वेळापूर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. त्यामुळे जेलमधून पळालेल्या कैद्याचा मूळगावी येण्याचा डाव वेळापूर पोलिसांच्या दक्षतेमुळे उधळला गेला आहे.

शिवाजी लक्ष्मण जाधव (वय ४२, रा. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे विसापूर जेलमधून पळालेल्या कैद्याचे नाव आहे. त्याला पुन्हा श्रीगोंद्यातील बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मळोली येथील शिवाजी जाधव याने २९ ऑगस्ट २०१३ रोजी दत्तात्रेय मल्हारी शिंदे यांचा घरी झोपलेले असताना धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. त्या प्रकरणी शिवाजी जाधव याला माळशिरसच्या सेशन कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

खूनप्रकरणी अटकेत असलेला शिवाजी लक्ष्मण जाधव हा श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र, २८ जुलै रोजी तो तुरुंग कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कारागृहातून पसार झाला होता.

Velapur Police
Solapur Dcc Bank : कल्याणशेट्टींची हसापुरेंसाठी फिल्डिंग : भाजपच्या सहकारातील बड्या नेत्याने स्वतंत्र बैठक घेत दिला शह...

या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २६२ अन्वये शिवाजी जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या शोधासाठी विविध पोलिस पथके रवाना करण्यात आली होती. वेळापूर पोलिसांचेही एक पथक शिवाजी जाधव याचा शोध घेत होते.

विसापूर जेलमधून पळालेला शिवाजी जाधव हा चांदापुरीमार्गे आपले मूळगाव असलेल्या मळोली येथे येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून वेळापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर वेळापूर पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि मळोली येथे येणाऱ्या जाधव याला सापळा रचून शिताफीने पकडले.

Velapur Police
Sunil Tatkare: "सुनेत्रा पवारांसोबत भेट झाली, पण..."; प्रशांत किशोर प्रकरणावर सुनील तटकरेंचं सविस्तर स्पष्टीकरण

वेळापूर पोलिसांनी पुढील तपासासाठी आरोपी शिवाजी जाधव याला पुन्हा बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूरचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, हवालदार यशवंत आनंदपुरे, साहिल तांबोळी, पोलिस नाईक श्रीकृष्ण पकाले, पोलिस कॉन्स्टेबल गणेश माळी, हिंगणगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com