Solapur Dcc Bank : कल्याणशेट्टींची हसापुरेंसाठी फिल्डिंग : भाजपच्या सहकारातील बड्या नेत्याने स्वतंत्र बैठक घेत दिला शह...

Sachin Kalyanshetti-Suresh Hasapure Meeting : सोलापूर डीसीसी बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या बैठकीनंतर भाजपमधील दुसऱ्या गटाने स्वतंत्र बैठक घेतल्याने सहकारातील गटबाजी चर्चेत आली.
Solapur Dcc Bank : कल्याणशेट्टींची हसापुरेंसाठी फिल्डिंग : भाजपच्या सहकारातील बड्या नेत्याने स्वतंत्र बैठक घेत दिला शह...
Published on
Updated on

Solapur, 07 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीला वेग आलेला असतानाच इकडे सोलापुरातही डीसीसी बॅंकेच्या रणनीतीला सुरुवात झाली आहे. सोलापूर डीसीसी बॅंकही भाजपला ताब्यात घ्यायची आहे, त्यासाठी मोर्चाबांधणी सुरू झाली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोटमधून जिल्हा बॅंकेवर येण्यासाठी इच्छूक असताना त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरेश हसापुरे यांच्यासाठी बैठक घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे सहकारात ताकद असलेल्या भाजपमधील ताकदवान दुसऱ्या गटानेही स्वतंत्र बैठक घेत कल्याणशेट्टींना शह दिल्याची चर्चा आहे. मात्र, ती बैठक भाजपच्या वरिष्ठांना रुचली नसल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने चार आठवड्यांत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मतदारयादीसाठी अर्हता तारीख (कट ऑफ डेट) जाहीर झाली असून ठरावाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, २०१८ पासून बॅंकेवर प्रशासक असून ते हटवून निवडणूक घेण्याची आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यानुसार सत्ताधारी भाजपकडून जोरदार मोर्चाबांधणी केली जात आहे. त्यात विद्यमान आमदारांनाच जिल्हा बॅंकेची पायरी चढायची असल्याचे दिसून येते.

आमदार राजेंद्र राऊत, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे हे बॅंकेत येण्यासाठी तीव्र इच्छूक आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे अक्कलकोटमधून सोसायटी मतदारसंघातून निवडून येऊ शकतात. कारण त्यांनी नव्या सोसायट्या स्थापन केल्या आहेत, तसेच माजी आमदार (स्व) सिद्रामाप्पा पाटील यांच्या बहुतांश समर्थकांनी कल्याशेट्टींशी जुळवून घेतले आहे. त्यामुळे ते सोसायटी मतदारसंघातून बॅंकेवर येणार, हे निश्चित मानले जात आहे. मात्र, त्यांनी नव्याने डावपेच आखले आहेत.

Solapur Dcc Bank : कल्याणशेट्टींची हसापुरेंसाठी फिल्डिंग : भाजपच्या सहकारातील बड्या नेत्याने स्वतंत्र बैठक घेत दिला शह...
BJP Dispute : भाजपच्या दोन देशमुखांमध्ये तासभर खलबतं; महापालिकेचा कारभार माजी मंत्र्यांच्या रडारवर

दक्षिण सोलापूरमधून माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी बैठक घेतल्याची चर्चा आहे. त्या बैठकीनंतर हसापुरे यांनी आपल्या समर्थक सोसाट्यांचे सर्व ठरावही घेतल्याची माहिती आहे. मात्र, कल्याणशेट्टी यांनी हसापुरे यांच्यासाठी बैठक घेतल्याने दक्षिणमधील भाजपचे नेते नाराज झाल्याची माहिती आहे.

भाजपमधील या नाराज गटाने नागरी बॅंका आणि तालुक्यांमध्ये सोसायट्यांमध्ये ताकद राखून असलेल्या नेत्यासोबत बैठक घेऊन हसापुरे-कल्याणेशट्टी यांना शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने दक्षिण सोलापूर भाजपमध्येच शह-कटशहाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे. आता ही दोन्ही गट प्रत्यक्ष निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकतात की सहमतीचे राजकारण करतात, हे पाहावे लागणार आहे.

Solapur Dcc Bank : कल्याणशेट्टींची हसापुरेंसाठी फिल्डिंग : भाजपच्या सहकारातील बड्या नेत्याने स्वतंत्र बैठक घेत दिला शह...
Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून शिवेंद्रराजे, उदयनराजे, रामराजेंसह 10 दिग्गज आऊट : गोरे, शंभूराज, मकरंदआबा, बाळासाहेब पाटलांना संधी

दरम्यान, भाजपमधील दुसऱ्या गटाने घेतलेली बैठक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आवडली नसल्याची चर्चा आहे. त्यांनी तशी नाराजी बोलून दाखवल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या विद्यमान आमदाराची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने भाजपमधील दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकतात की काय, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com