Video : कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत 'ऑल इज नॉट वेल', शहरप्रमुखांची जिल्हाप्रमुखांविरोधातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल...

Kolhapur shiv sena Thackeray Group politics : शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. झाला आहे.
Ravikiran Ingawale
Ravikiran Ingawale Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून चढाओढ सुरू आहे. विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने ही जागा काँग्रेसला जाईल अशी शक्यता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सोडल्यानंतर तोडजोडीअंती ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील यांनी केली आहे. तर शिवसैनिकांची पारंपारिक जागा असल्याने या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे.

या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून शहरप्रमुख रविकिरण इंगवले आणि उपनेते संजय पवार हे दोघेही शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूर उत्तर मधून इच्छुक आहेत. मात्र मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेल्या फोन नंतर शिवसेना ठाकरे गटांमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळल्याचे दिसून येत आहे.

Ravikiran Ingawale
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांची जीभ घसरली, समरजितसिंह घाटगेंबद्दल आक्षेपार्ह विधान

काय आहे व्हायरल झालेल्या फोन संभाषणात

संजय पवार यांचे पीए अभिजीत बुकशेट यांना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी संपर्क केल्यानंतर 'अहो बुकशेट आम्ही जिवंत आहोत. पत्रिकेत नाव नसलं तरी आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत. तुमच्या नेत्याला सांगा हे योग्य नाही. संजय पवार, विजय देवणे आणि सुनील मोदी यांचा नव्हे. हा पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. पक्षाचा मालक व्हायचा प्रयत्न करू नका. होणारा कार्यक्रम हा रविकिरण इंगवले यांचा नसून पक्षाचा आहे.

Ravikiran Ingawale
Dhangar Reservation : 'मुख्यमंत्रीसाहेब, आपली खुर्ची डळमळीत झाली आहे, तुम्ही धनगरांना आरक्षण दिलं तर...'

पक्षाला उमेदवारी मिळवण्यासाठी हा कार्यक्रम आहे. तुमच्या असल्या वागण्यामुळे राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांच्यात दुफळी पडली होती. पक्ष अडचणीत आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे. आमच्या पक्षाचे तिकीट जाऊ नये ही आमची इच्छा आहे. उमेदवारी कोणालाही मिळावी मी दिवस-रात्र त्यांच्यासोबत राहीन. झालेल्या प्रकाराबाबत मी संपर्कप्रमुख अरुण भाई धुतवडकर यांच्याकडे तक्रार देणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com