Dhangar Reservation : 'मुख्यमंत्रीसाहेब, आपली खुर्ची डळमळीत झाली आहे, तुम्ही धनगरांना आरक्षण दिलं तर...'

Solapur Rasta Roko Andolan : मराठा समाजानंतर राज्यात धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आज समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरात येणाऱ्या महामार्गावर धनगर बांधवांनी ठिय्या दिला होता.
Dhangar Reservation Agitation
Dhangar Reservation AgitationSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 September : मराठा समाजानंतर राज्यात धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आज समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरात येणाऱ्या महामार्गावर धनगर बांधवांनी ठिय्या दिला होता. दुसरीकडे, पंढरपूरमध्येही राज्यस्तरीय उपोषण सुरू आहे. ‘तुम्ही धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू केले, तर आम्ही तुमचे फोटो देव्हाऱ्यात ठेवून पूजण्यात येतील,’ अशी भावना आंदोलक धनगर बांधवांनी व्यक्त केली.

धनगर समाजाला घटनेने दिलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी राज्यातील धनगर समाजाच्या (Dhangar community) वतीने गेली पंधरा दिवसांपासून उपोषण आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूर शहरात (Solapur) येणाऱ्या सर्व मार्गावर धनगर बांधवांनी ढोल वाजवत आंदोलन करण्यात आले. सोलापूर-बार्शी मार्गावर बार्शी टोल नाका येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पंढरपूरमध्ये (Pandharpur) समाज बांधव बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्या उपोषणाला राज्याच्या मंत्रिमंडळातील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली होती. त्यावेळी मंत्र्यांच्या आश्वासनावर समाधान न झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचे ठरले होते.

मंत्र्यांच्या भेटीनंतर धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत धनगर आणि धनगड हे एकच आहेत, असे परिपत्रक काढण्याचा निर्णय झाला होता. मात्र, अजूनही ते परिपत्रक शासनाकडून काढण्यात आलेले नाही, त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Dhangar Reservation Agitation
Balasaheb Thorat Video : तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? बाळासाहेब थोरातांच्या उत्तराने वाढविला सस्पेन्स...

सोलापूर-विजयपूर महामार्गावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरा मैल या ठिकाणी धनगर समाज बांधवांकडून महामार्ग अडविण्यात आला होता. त्या ठिकाणी तालुक्यातील समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी महिला आणि युवक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण देण्याची राज्य सरकारच्या पातळीवर जी कार्यवाही सुरू आहे, त्या कार्यवाहीला गती येण्यासाठी आम्हाला आंदोलन केले आहे. धनगर आणि धनगड हे एकच आहे, असे परिपत्रक राज्य सरकार लवकरच काढेल, असा आम्हाला विश्वास वाटत आहे, असेही धनगर बांधवांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धनगर आणि धनगड हे एकच आहेत, याबाबतचे परिपत्रक काढण्यासाठी सकारात्मक आहेत, हे आम्हाला रात्री सांगण्यात आले आहे. आमच्या एका उपोषणकर्त्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता. त्यात त्यांनी सांगितलं की धनगरांची एसटी आरक्षणाची कार्यवाही येत्या तीन चार दिवसांत करणार आहोत, अशी माहिती आम्हाला देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण संवेदनशील आहात. पण महाराष्ट्रात आपली खुर्ची डळमळीत झाली आहे. पण तुम्ही धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू केले तर आम्ही तुमचे फोटो देव्हाऱ्यात ठेवून पूजण्यात येतील.

Dhangar Reservation Agitation
Mahayuti : शिवसेना-भाजपचा मोठा निर्णय; मुंबईतील 'या' मतदारसंघांची होणार अदलाबदली?

तुम्ही गेली सहा ते सात महिन्यांत ५४ लाख कुणबी दाखले मराठा समाजाला दिले, त्याचप्रमाणे आमचं तर घटनेत आरक्षण नमूद केलेले आहे त्यामुळे ते तुम्ही आम्हाला द्याल, अशी आमची अपेक्षा आहे, असा विश्वास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर व्यक्त करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com