Video Neelam Gorhe :श्रीकांत शिंदेंना 'मुख्यमंत्र्यांचे कार्ट' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवर नीलम गोऱ्हे भडकल्या; म्हणाल्या...

Video Neelam Gorhe on uddhav Thackeray : समन्वयाने त्यांनी विचार करायला हवा होता, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे यांना लगावला. आज कोल्हापुरात त्या बोलत होत्या.
Neelam Gorhe
Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना कार्ट असा उल्लेख केल्यानंतर आज उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे यांना कानपिचक्या दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख कार्ट असं केला. 'आपलं ते बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट' अशी म्हण सांगत मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या ठाकरे यांनी सर्वांनाच बाब्या म्हणावं नाहीतर कार्ट म्हणावं. इतकातरी समन्वयाने त्यांनी विचार करायला हवा होता, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे यांना लगावला. आज कोल्हापुरात त्या बोलत होत्या.

जागा वाटपा संदर्भात महायुती मधील निर्णय वरिष्ठ नेते घेतील. मात्र सर्वात शेवटी जो स्मित हास्य करतो ते विजयाचे स्मित हास्य असते. तिकीट मिळवून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणे हीच कसोटी आहे. मुख्यमंत्री हे सैनिक आणि कार्यतत्पर नेते म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनेचे ठाम रक्षण करताना दिसतात. लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि छत्रपती संभाजी नगरातील जागा आम्हाला का पाहिजेत हे मित्र पक्षांना त्यांनी सांगितलं. पण केवळ जागा मागितल्या नाही तर त्या निवडून आणून दाखवल्या. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) हे जागा जास्त मागत आहेत. कारण आमचा स्ट्राइक रेट जास्त आहे, त्यामुळे महायुतीच्या विजयामध्ये शिवसेनेचा वाटा सिंहाचा असणार असा विश्वास गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

Neelam Gorhe
CM Solapur Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द

करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही जो संकल्प केला तो गुप्त असतो. मात्र पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार येणार आहे. मागच्या वेळी संकल्प केला होता तो पूर्ण झाला. आता देखील महायुतीचे सरकार यावे आणि मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे व्हावेत असं साकडे देवीला घातला असल्याचं सांगितलं.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वरून विचारलेल्या प्रश्नावर गोऱ्हे यांनी अशा सटर बटरवर मी प्रतिक्रिया देत नसल्याचा टोला लगावला. महायुतीतून जे नेते महाविकास आघाडीकडे चालले आहेत ते मूळचे काँग्रेस विचार धारेचेच आहेत. शिवसेनेतून कोणीही जात नाही.

Neelam Gorhe
Video Rajesh Kshirsagar : 'कोल्हापूर दक्षिणचा आमदार शिवसेना ठरवणार' क्षीरसागरांनी ठणकावले

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही १७५ जागा पेक्षा पुढे जाऊ, हे सातत्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगली मत मिळाले. प्रत्येकाला तिकीट देऊन निवडून आणण्याची हमी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घेतली आहे. अधिकच्या ज्या जागा घेऊ त्यांना देखील निवडून आणू. शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पण उमेदवार निवडून आणू. युतीधर्म आमच्याकडून योग्यपणे निभावला जाईल याची आम्हाला खात्री असल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूरातील महायुती धुसफुसवरून बोलताना, कोल्हापूर जिल्ह्यातील धुसफुस म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला आशा महत्त्वाकांशा असते. प्रत्येक इच्छुक पदाधिकारी सातत्याने कार्यक्रमात आणि समाजसेवेत कार्यरत आहे. या सर्व समस्यांवर पंतप्रधान मोदी अमित शाह आणि राज्यातील महायुतीचे प्रमुख नेते मार्ग काढतील. वेळेवर हा मार्ग निघालेला दिसेल. असंही त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com