CM Solapur Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द

CM Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थिती होण्याची शक्यता आहे.
Ekanth Shinde
Ekanth ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 October : सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्वाची ठरणारी आजची मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करावी लागली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा सोलापूर दौराही पाचव्यांदा रद्द झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज सकाळी साडेअकरा वाजता मुंबई विमानतळावरून सोलापूर शहरात होणाऱ्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी येणार होते. हा कार्यक्रम आज साडेबारा वाजता होणार असून त्याची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत आज अचानक बिघडल्याने त्यांचा आजचा सोलापूर दौरा (Solapur Tour) रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थिती होण्याची शक्यता आहे. कारण, या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमाला आलेल्या आहेत.

Ekanth Shinde
Mahayuti News : महायुतीचं टेन्शन वाढलं; चिंचवडच्या भाजपच्या जागेवर राष्ट्रवादीने केला दावा

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम अक्कलकोटमध्ये सुरू आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर शहरात दाखल झाले आहेत, त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा वचनपूर्ती सोहळा होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा यापूर्वी चार वेळा रद्द झाला आहे. तब्येत बिघडल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पाचव्यांदा आपला सोलापूर दौरा रद्द केला आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यात पोचले आहेत. मात्र, शिंदे यांचा सोलापूर दौरा रद्द झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Ekanth Shinde
Khadakwasala Assembly Election: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चढाओढ; चार निवडणुका वेटिंग असलेल्या नेत्याने दिला इशारा

सोलापूर दौऱ्याबरोबरच मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय धनगर समाजाचा आरक्षणाच्या संदर्भात अहवाल आज मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने हे सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींचा कार्यक्रम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com