महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने हत्या केली. तेव्हापासून काही समाजघटक, राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी आणि संघटना नथुराम गोडसेचे समर्थन करत आहेत, त्याचे पुतळे उभारून उदोउदो करत आहेत. अशीच घटना आता पंढरपूरमध्ये घडल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केले आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात नथुराम गोडसे (Nathuram Godse), स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Sawarkar) यांचा बॅनर हातात उंचावून नथुराम गोडसेचा जयजयकार केला जात आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सोबत घेतले जात आहे.
'आयडियल ऑफ हिंदुत्व' या बॅनरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांसह आणि नथुराम गोडसेचा फोटो आहे. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार संताप व्यक्त केला आहे. त्यांनी गोडसेच्या जयजयकाराचा व्हिडिओ ट्वीट करतानाच या समाजकंठकांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, मागणी केली आहे. शिवाय महाराष्ट्राच्या मातीत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काही हिंदुत्वादी संघटना अनेकदा महात्मा गाधीजींचे मारेकरी नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करत आहेत, हे वारंवार दिसून आले आहे. देशातील काही भागात गोडसेचे पुतळे उभारण्याचे प्रयत्न झाले तसेच मंदिर बांधण्याचाही प्रकार झाला होता. काही गोडसे समर्थक गोडसे जयंतीही साजरी करतात. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या व्हिडीओमुळे हे लोण आता पंढरपूरमध्ये (Pandharpur) धडकल्याचे दिसत आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.