विखे पाटील आता हेवीवेट मंत्री : भाजपमध्ये वजन वाढले

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना कोणतं खातं मिळणार! याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi, Sharad Pawar News
Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi, Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Radhakrishna Vikhe Patil : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांना कोणतं खातं मिळणार! याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. आज त्यांच्याकडे महसूल खाते चालून आल्याने आज त्यांच्याच नावाची अधिक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक खात्यांचा कारभार सांभाळला पण, आजपर्यंत त्यांना महसूल हे वजनदार खाते कधीच मिळाले नव्हते.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi, Sharad Pawar News
अमित शहांनी विखे पाटलांवर दाखविला विश्वास : दिले महसूलसारखे वजनदार खाते

जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे ज्येष्ठ नेते म्हणून पाहिले जाते. या दोघांनीही कधीही एकमेकांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. निडणूक असो किंवा नसो आरोप-प्रत्यारोप, चिमटे, कोपरखळी मारल्याशिवाय त्यांची भाषणं संपतच नाहीत. हे दोघेही तसे मूळ काँग्रेसचेच. मात्र, थोरातांनी काँग्रेस कधी सोडली नाही. तर विखे पाटलांचा प्रवास काँग्रेस, शिवसेना ते भाजप असा राहिला. विखे जेथे गेले तेथे त्यांना मंत्रिपद मिळाले. मात्र, महसूल खाते कधीही मिळाले नव्हते. आज मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर विश्र्वास दाखविला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुन्हा महसूल मंत्री होतील अशी चर्चा होती पण, आज चक्क या खात्याची जबाबदारी विखे पाटील यांच्याकडे आली. आजच्या खाते वाटपाकडे पाहिले तर फडणवीसांच्या गुडबुकमध्ये ते गेल्याचे दिसून येते.

राज्यात जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर आली त्या त्या वेळी थोरातांकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आली. म्हणजेच थोरातांचेही काँग्रेसमध्ये वजन होते आणि आजही आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज देशमुख यांच्या मंत्रिमंडळात थोरात हे महसूल मंत्री राहिले. त्यानंतर म्हणजे 2014 मध्ये फडणवीस सत्तेवर आल्यानंतर ते विरोधी बाकावर आले. पुढे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही बनले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर थोरात पुन्हा महसूल मंत्री बनले.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi, Sharad Pawar News
Dr. Sujay Vikhe Patil : महाराष्ट्राला दाखवून देऊ, दोन महसूल मंत्र्यांत काय फरक आहे...

आता शिंदे सरकारमध्ये विखे पाटील हे जिल्ह्यातील एकमेव मंत्री बनले आणि तेही महसूल खात्याचे. भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याचा विचार करता येथे राष्ट्रवादीचे सहा आमदार, भाजपचे तीन, काँग्रेसचे दोन आमदार आणि अपक्ष एक असे बारा आमदार आहेत. म्हणजेच राष्ट्रवादीची येथे ताकद आहे. भविष्यातील निवडणुकीत भाजपची ताकद वाढविण्याची जबाबदारी अर्थात विखेपाटील यांच्यावर असेल असे दिसते.

Radhakrishna Vikhe Patil News, Ahmednagar Latest Marathi, Sharad Pawar News
'महसूल'साठी चंद्रकांतदादा-विखे पाटलांमध्ये चुरस : खातेवाटपचा अजुनही तिढा कायम

भाजपतील दिग्गजांवरही कडी

मूळ भाजपचे असलेले वजनदार नेते म्हणून चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आदी नेते असताना विखेपाटील यांच्याकडे हे महत्त्वाचे खाते आले आहे. विखेही सहकार क्षेत्रातील मोठे नाव असलेले नेते आहेत. नगर जिल्हा साखरसम्राटांचा म्हणूनही ओळखला जातो. यापुढे साखरपपट्ट्यातील जनता कोणाला कौल देते हे पाहावे लागेल. काही असले तरी विखेपाटील यांना महसूल मिळाल्याने भाजपमधील त्यांचे वजन वाढले. ते हेवीवेट मंत्री बनले आहेत हाच आजच्या विस्ताराचा अर्थ काढावा लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com