Dr. Sujay Vikhe Patil : महाराष्ट्राला दाखवून देऊ, दोन महसूल मंत्र्यांत काय फरक आहे...

राज्यातील मंत्र्यांच्या खाते वाटपावर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी भाष्य केले.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Dr. Sujay Vikhe Patil : राज्यातील शिंदे गट व भाजपच्या नवीन मंत्र्यांना आज खाते वाटप करण्यात आले. या खाते वाटपात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना महसूल, पशूसंवर्धन व दुग्धविकास ही खाती मिळाली आहेत. महाविकास आघाडीच्या काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खाते होते. सत्ता परिवर्तन होताच महसूलचा पदभार राधाकृष्ण विखे पाटलांकडे आला आहे. विखे व थोरात यांच्या वैर आहे. या खाते वाटपावर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी भाष्य केले.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, महसूल खाते ही काही सोन्याची खाण नाही. लोकांना या खात्याबाबत एवढा उत्साह का असतो हे माहिती नाही. संविधानिक दृष्ट्या हे उच्च खाते आहे. आमच्या 35 वर्षांच्या राजकीय संघर्षात सर्वात उच्चांकी आम्ही पोचलो आहोत. याचा आनंद वेगळा आहे.

Dr. Sujay Vikhe Patil
Vikhe Patil News : विखे पाटील आमदार नाहीत तर नामदार : सुजय विखेंनी केली चूक दुरुस्त

ते पुढे म्हणाले की, भाजपने आम्हाला मान-सन्मान दिला. या पूर्वी आम्ही ज्या पक्षात होतो. तिथे प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष होता. कधी कार्यक्षमता पाहून आम्हाला न्याय मिळाला नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. आम्हा खात्यापेक्षा भाजपमध्ये मान दिला. भाजपमध्ये गेलेल्यावर टीका करणाऱ्यांना आमचे उदाहरण द्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भाजप हा एक वैचारिक पक्ष आहे. तुमच्या क्षमता असेल, तुम्ही पक्षासाठी काम केले तर तुम्हाला निश्चित न्याय मिळेल. आमच्या उदाहरणावरून याबाबत सर्वांना विश्वास पटेल. ज्यांनी आरोप केलेत त्यांची तोंडे बंद करायची आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Dr. Sujay Vikhe Patil
वाळू आणि बदल्यांच्या पैशात अडकलेल्यांचा भविष्यात हिशेब होणार - सुजय विखे

जे काही खाते मिळेल त्यात वेगळेपण दिसावे ही आमची भूमिका आहे. त्या दृष्टीने मंत्रीपदाची जेवढ्या कालावधीसाठी संधी मिळेल त्यातून महाराष्ट्राला दाखवून देऊ की, दोन महसूल मंत्र्यांत काय फरक आहे. सर्वसामान्य जनतेला कुपनासाठी, सातबाऱ्यात इतर हक्कातून नाव काढण्यासाठी पैसे लागू नयेत. वाळू माफियाची साखळी बंद करायला हवी. त्यादृष्टीने आम्ही काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शासकीय बदल्यांत ज्यांनी पैसे घेतले त्यांनी ते पैसे परत करावेत. बदल्यांतील भ्रष्टाचार बंद होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांवरील दबाव कमी होणार नाही. जे बोलतो ते करून दाखवू, असे ठामपणे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com