Mahadevi Elephant : कोल्हापूरला रडवलेल्या 'पेटा' संस्थेवर आमदार कोरे तुटून पडले, सुंदर हत्तीची पुनरावृत्ती म्हणजे महादेवी

Vinay Kore on Mahadevi Elephant : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात सध्या महादेवी हत्तीची चर्चा आहे. येथील नांदणी जैन स्वस्तीक भटारक मठातील हत्ती अंबानींच्या वनतारा येथे नेण्यात आला आहे. ज्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Mahadevi Elephant
Mahadevi Elephantsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी महादेवी हत्ती प्रकरणावरून प्राणी मित्र संघटनांवर जोरदार टीका केली आहे.

  2. त्यांनी नाव न घेता PETA सारख्या संस्थांवर आरोप करत म्हटलं की या संस्था परदेशी निधीसाठी खोट्या केसेस दाखल करतात.

  3. महादेवी हत्ती प्रकरण हीच श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थान हत्ती प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय असणाऱ्या महादेवी हत्तीबाबत पन्हाळा शाहूवाडी चे आमदार विनय कोरे यांनी पेटा या प्राणी संस्थेचे नाव न घेता ताशेरे ओढले आहेत. तेराशे वर्षाची धार्मिक परंपरा आणि लोकभावनेचा अनादर करून काही प्राणी मित्र संघटना केवळ परदेशातून मिळणाऱ्या निधीसाठी खोट्या केसेस दाखल करतात अशी टीका, आमदार विनय कोरे यांनी केली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात. वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या सुंदर हत्तीबाबत जे घडले त्याचीच पुनरावृत्ती महादेवी हत्तीबाबत झाल्याचा आरोप आमदार कोरे यांनी केला आहे. (Vinay Kore Mahadevi elephant case Kolhapur reaction against animal activists foreign funded false cases)

नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात हत्ती पाळण्यासंदर्भातील 600 वर्षांपूर्वीची परंपरा आहे. मात्र काही प्राणी संघटनेच्या तक्रारीनंतर न्यायालयाने या महादेवी हत्तीला स्थलांतर करण्याचा निर्णय दिला. सध्या महादेवी या हत्तीला गुजरातमधील वनतारा प्राणीसंग्रहालयात नेण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नांदनी गावामध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळेच महादेवीला घेऊन जात असताना उद्रेक झाला.

Mahadevi Elephant
Mahadevi Elephant : एका हत्तीणीसाठी अख्खं 'कोल्हापूर' रडलं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत झटलं... विनंती, याचिका, दगडफेक इतंकच काय 'जियोही' बायकॉट केलं!

पण असाच प्रकार वाडी रत्नागिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योतिबा मंदिराच्या सुंदर हत्तीबाबतही घडला होता. यावेळी देखील आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. पण या लढ्याला यश आले नाही. त्यावेळी सुंदर हत्तीला बेशुद्ध करून बंगरगट्टा जंगलात नेण्यात आले. तिथे काळजी करणाऱ्या माहुताला मारण्यात आले. नंतर सुंदर हत्तीचा ही मृत्यू झाला असा दावा आमदार कोरे यांनी केला आहे.

दरम्यान आमदार विनय कोरे यांनी सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथील दाखला देत, तीच न्यायालयाने जिवंत नागाची पूजा करण्यासाठी 23 वर्षानंतर अटी आणि शर्ती घालून पूजेला मान्यता दिली. त्याच धर्तीवर या महादेवीबाबत काही निर्णय घेता येईल का? यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती देखील आमदार विनय कोरे यांनी दिली.

या हत्तीला परत आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवण्यास सुरु केली आहे. खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचे सांगितले होते.

Mahadevi Elephant
Mahadevi Hatkanangale Politics : 'महादेवी' गुजरातला गेली, नेत्यांच्या डोळ्यात राजकीय अश्रू! समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड

FAQs :

1. महादेवी हत्ती प्रकरणावर आमदार विनय कोरे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी प्राणीमित्र संघटनांवर टीका करत, या संस्थांचा उद्देश परदेशातून निधी मिळवणे असल्याचा आरोप केला.

2. महादेवी हत्ती प्रकरण काय आहे?
वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र महादेवी मंदिरातील हत्तीच्या वापरावर प्राणी हक्क संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

3. विनय कोरे यांनी कोणत्या आधीच्या घटनेशी याची तुलना केली?
ते म्हणाले की, ही घटना श्री क्षेत्र ज्योतिबा हत्तीबाबत घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com