Virendra Mandlik
Virendra MandlikSarkarnama

Virendra Mandlik : 'लोक खासगीत सांगतात, आमच्यावर दडपण': कागलच्या राजकारणावर वीरेंद्र मंडलिकांचा खळबळजनक दावा!

Virendra Mandlik’s Sensational Claim : कागलच्या राजकारणात माजी खासदार वीरेंद्र मंडलिकांनी मोठा खुलासा केला. लोक खासगीत राजकीय दडपण असल्याचे सांगतात असा दावा त्यांनी केला आहे. संपूर्ण बातमी वाचा.
Published on

राज्यासह जिल्ह्यातील लक्षवेधी लढत असलेल्या कागल नगरपालिकेसाठी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आज कागल शहरात भव्य पदयात्रा काढण्यात आली, एका बाजूला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांची युती विरुद्ध शिवसेना असा रंगतदार सामना कागलच्या राजकीय विद्यापीठात रंगला आहे. 1996 च्या नगरपरिषद निवडणुकीची पुनरावृत्ती कागलमध्ये होईल असा विश्वास युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला.

घाटगे आणि मुश्रीफ साहेब यांच्या युतीवर टीका करण्यापेक्षा लोक मतदानातूनच त्यांना उत्तर देतील. ज्यावेळी आम्ही घर तू घर प्रचार केला त्यावेळी मतदार खाजगीत सांगत आहेत की आमच्यावर दडपण आहे. तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत. दोघांची युती ही मतदारांना रुचलेली नाही. त्यामुळे लोक येत्या तीन तारखेला त्याचे उत्तर स्वतः देतील, असेही शिवसेनेचे युवा सेना नेते वीरेंद्र मंडलिक म्हणाले.

कागल विधानसभा मतदारसंघातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांची अपेक्षित युती झाल्यानंतर तालुक्यातील मंडलिक गटानेही शिवसेनेच्या चिन्हावर सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. 1996 मध्ये झालेल्या कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत मातब्बर घाटगे पॅनलच्या विरोधात माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी स्वतंत्र पॅनल उभा करून 17 पैकी 7 जागा निवडून आणल्या होत्या.

आज काहीच तसंच चित्र कागल मध्ये निर्माण झालं असून दोन्ही विरोधक सत्तेसाठी एकत्र आल्यामुळे ही युती कागलच्या जनतेला पचनी पडलेली नाही त्यामुळेच 1996 च्या निवडणुकीची पुनरावृत्ती कागलकर करतील असा विश्वास शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेना पक्षनिरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला.

Virendra Mandlik
Central Government Scheme : 'झिरो बॅलन्स'वरही मिळणार पैसे! काय आहे केंद्र सरकारची 'ही' विशेष योजना?

मंडलिक गटासाठी आरपारची लढाई....

कागल मतदार संघ राजकीय पक्षांपेक्षा गटातटाच्या राजकारण महत्वाचे आहे. लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यानंतर माजी खासदार संजय मंडलिक आणि वीरेंद्र मंडलिक यांनी गटाची राजकीय भूमिका पुढे ठेवली आहे. संजय मंडलिक यांनी 2019 ला लोकसभा जिंकली होती.

Virendra Mandlik
India nuclear decision : भारताला अण्वस्त्र हल्ला करायचा आहे; निर्णय पंतप्रधान घेऊ शकतात का?

आता कागल नगरपालिकेत मुश्रीफ घाटगे युतीने मंडलिक कटाला एकाकी पाडले आहे. मात्र मंडलिक गटाने नगराध्यक्ष पदासह सर्वच जागा लढवत विरोधकांसमोर आव्हान उभं केलं आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कागल नगरपालिकेसाठी मंडलिक गटाने पॅनेल उभा केल्याने त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com