
Nagpur, 26 January : सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या आमच्यातील काही लोकांना अजूनही आम्ही सत्तेत आहोत, असंच वाटतंय. आम्ही विरोधात आहोत, याची आम्हाला जाणीव झाली पाहिजे. हे कोणीतरी सांगतो म्हणून नव्हे. घातलेल्या पाण्याने गंगा वाहत नसते. आम्ही स्वयंस्फूर्तीने विरोधी पक्षाचं काम केलं पाहिजे. काँग्रेसच्या लोकांनी अनेक वर्षे सत्ता भोगल्यामुळे ते थोडसे सुस्त आहेत. त्यांना नव्याने चार्ज करणे खूप महत्वाचे आहे, अशा शब्दांत माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले.
विदर्भातील ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंत पुरके (Vasant Purke ) यांनी माध्यमांशी बोलताना पक्षातील सद्यस्थितीवर परखडपणे भाष्य केले. आमच्यातील सत्ता अजूनही गेलेली नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नावर अजूनही पेटून उठत नाही. मात्र, ती भूमिका आगामी काळात घ्यावी लागेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
ते म्हणाले,आम्ही स्वतः पेटून उठलं पाहिजे, अन्यायाच्या विरोधात चिडून उठलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विधान केल्यानंतर आम्ही मोर्चे काढले. पण, पाहिजे तसे आम्ही चिडलो नाही.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा अपमान झाला तरी आम्ही चिडत नाही. शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान झाला तरी आम्ही पेटून उठत नाही. काँग्रेसच्या लोकांनी ही चीड, संताप मांडला पाहिजे, असे आवाहनही पुरके यांनी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
मी माझ्या यवतमाळ जिल्ह्यात आंदोलन करणार आहे. दोनच खासदार होते, त्या भाजपने कधीही हिम्मत हारली नाही आणि आपण दोन किंवा तीन निवडणुका हरल्या तर हिम्मत हारता का, असा सवालही त्यांनी काँग्रेसच्या हातपाय गाळलेल्या नेत्यांना केला. काँग्रेसच्या नेत्यांना प्रोत्साहीत करण्याची गरज आहे. ती केली पाहिजे. मी स्वतः आता विदर्भात फिरायला सुरुवात करणार आहे, असेही माजी मंत्री वसंत पुरके यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.