विशाल पाटलांनी पहिल्या भाषणात मूळ मुद्द्यालाच हात घातला, तोही इंग्रजीतून; नेमके काय म्हणाले?

Sangli, Kolhapur Flood : कोल्हापूर, सांगलीत जिल्ह्याला 2005, 2019 आणि 2021 मध्ये पूराचा मोठा फटका बसला होता.
Vishal Patil
Vishal PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्यातील सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विशाल पाटील यांनी केलेल्या बंडखोरीने देशाचे लक्ष वेधून घेतले. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी काँग्रेसला अधिकृतपणे पाठिंबा दिला.

आता त्यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनातील आपल्या पहिल्या भाषणात सांगली, कोल्हापूरचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला, तोही इंग्रजीतून. त्यांच्या भाषणाने सांगलीकरांचे मन जिंकले आहे.

सध्या राज्यात मुसळधार सुरू आहे. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून या पूरामुळे सांगली, कोल्हापूर Kolhapur या जिल्हांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. नेमका तोच प्रश्न विशाल पाटील यांनी लोकसभेच्या अधिवेशनात आपल्या पहिल्या भाषणातून केंद्राच्या दरबारी मांडत कर्नाटक आणि राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले.

विशाल पाटील Vishal Patil म्हणाले, कोल्हापूर, सांगलीत जिल्ह्याला 2005, 2019 आणि 2021 मध्ये पूराचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर आजही तीच स्थिती या जिल्ह्यात आहे. त्यामुळे कर्नाटकमधील आलमट्टी धरणांची उंची वाढवण्यावरून विशाल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. याबाबत त्यांनी इंग्रजीतून जोरदार भाषण केले.

विशाल पाटील यांनी, कृष्णा नदीवरील साताऱ्यातील कोयना धरण आणि कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील आलमट्टी धरणावर जोरदार बॅटिंग केली. राज्यात सुरू असलेल्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे दोन्ही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि पशुधनाचे नुकसान झाल्याकडेही पाटील यांनी केंद्राचे लक्ष वेधून घेतले.

Vishal Patil
Lok Sabha Session : केंद्रीय मंत्री थेट काँग्रेस खासदाराच्या अंगावर धावून गेले; संसदेत नको ते घडलं...

लोकसभेच्या निवडणुकीत मागणी करूनही महाविकास आघडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटली होती. त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवून विशाल पाटील यांनी विजयाची पताका फडकवली. लोकसभेच्या निवडणुकीत नगरमध्ये इंग्रजीचा मुद्दाही गाजला होता. त्यानंतर खासदार निलेश लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेतली.

आता विशाल पाटील यांनी थेट आपला आणि शेजारील मतदारसंघातील पूरस्थितीबाबत इंग्राजीतून माहिती देऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केंद्राकडे केली. त्यांच्या या भाषणाचे कोल्हापूर, सांगलीतून कौतुक होत आहे.

Vishal Patil
Jayant Patil On Devendra Fadnavis : 'जेव्हा मेंदू काम करायचं थांबतो, तेव्हा..' ; जयंत पाटलांचा नाव न घेता फडणवीसांवर निशाणा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com