Ayodhya Ram Temple : राम मंदिरावरून सांगलीत स्पर्धा, विश्वजीत कदम-सुरेश खाडे आमनेसामने

Vishwajeet Kadam Vs Suresh Khade : सांगलीत राम मंदिराच्या दोन प्रतिकृती
Vishwajeet Kadam, Suresh Khade
Vishwajeet Kadam, Suresh KhadeSarkarnama

अनिल कदम

Sangli Political News : अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना सोमवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर देशभर जय श्रीराम असा जयघोष केला जात आहे. यातच सांगलीत हिंदुत्वाचे कार्ड वापरत काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी श्रीराम भक्ती उत्सवाचे आयोजन केले आहे. त्यासाठी श्रीराम मंदिराची मोठे प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यात श्रीराम मंदिराच्या जल्लोषात भाजप पिछाडीवर असल्याची चर्चा होती.

यावर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी काँग्रेसच्या ईर्षेवर मिरजेत तब्बल 25 हजार चौरस फुटाचे श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली. येथे विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापणेवरून स्पर्धा रंगल्याची दिसून येत आहे.

Vishwajeet Kadam, Suresh Khade
Congress Politics : आघाडीत ठिणगी! पूर्व विदर्भातील सर्व जागांवर काँग्रेसचा दावा; घटक पक्षांची भूमिका काय?

श्रीराम मंदिरातील (Ram Temple) मूर्ती प्रतिष्ठापणेवरून जिल्ह्यातील भाजपमध्ये काहीसे शांततेचे वातावरण होते. त्याचा फायदा उठवत डॉ. पतंगराव कदम फाउंडेशन, पृथ्वीराज पाटील फाउंडेशन व जीपीएमटीच्यावतीने या उत्सवाचे आयोजन केले. त्यासाठी श्रीराम मंदिराची प्रतिकृतीही उभारण्यात आली.

हे मंदिर सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत श्रीरामाचे दर्शनासाठी खुले राहणार आहे. प्रभू श्रीराम हे सर्वच भारतीयांना पूज्य आहेत. आयोध्येत जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे असे प्रत्येकालाच वाटते. पण आजघडीला ते शक्य होईलच असे नाही. त्यामुळे सांगलीकरांना आपल्या नगरीतच प्रभू श्रीरामाचे दर्शन व्हावे या हेतूने काँग्रेसने प्रतिकृती उभारल्याचे सांगण्यात आले.

Vishwajeet Kadam, Suresh Khade
Ajit Pawar Group : अजितदादांनी जयंत पाटलांच्या गडात पेरला सुरुंग, बत्ती लावताच धमाके सुरू

अशी आहे खाडेंनी उभारलेली प्रतिकृती

काँग्रेसच्या मंदिरानंतर राज्याचे कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे (Suresh Khade) यांनीही मिरजे येथे आयोध्येतील राम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारली. मंदिरावरील नक्षीकाम सुबकपणे केले जात आहे. अयोध्येतील राममंदिराप्रमाणेच मंदिरामध्ये 140 पिलर आहेत, 25 हजार चौरस फुटामध्ये मंदिर उभारले आहे. 22 शिखर उभारले आहेत. मंदिर उभे करणासाठी मोठ्या प्रमाणात स्टील, फायबर, रंग प्लायवुड याचा वापर करण्यात आला आहे. मंदिराचा गाभारा अर्ध गोलाकृती आहे. लख प्रकाश देणारी वेगवेगळ्या आकाराचे शंभर झुंबर आहेत. मंदिरासमोर 100 बाय 25 चे भव्य गेट उभारले आहे. 11 फूट उंचीचे दोन हनुमान मंदिर आहेत.

Vishwajeet Kadam, Suresh Khade
Manoj Jarange Mumbai Morcha : राम मंदिर सोहळा अन् त्याचवेळी जरांगेंचा आरक्षण मोर्चा; धनंजय देसाईंच्या प्रतिक्रियेने खळबळ

कार्यक्रमांची रेलचेल

खाडेंनी उभे केलेल्या मंदिरात रामभक्तांना प्रभुरामाचे दर्शन घेता येणार आहे. हा कार्यक्रम कोणत्याही पक्षाचा नाही तर रामांचा कार्यक्रम आहे. प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अंदाजे दहा लाखांपर्यंत लोक भेट देवू शकतील, असे नियोजन केले आहे. 21 रोजी राम मंदिर गोठण गल्ती येथून भव्य शोभा यात्रा काढण्यात येईल. तर 22 रोजी सायंकाळी 6 वाजता हषिकेश रानडे, जितेंद्र अभ्यंकर व स्वरदा गोडबोले यांचा भक्तीमय गीतरामायणाचा कार्यक्रम होणार आहे.

23 व 24 रोजी सायंकाळी, श्रीराम कथा नाटीका, शालेय स्पर्धा होणार आहे. तसेच 25 आणि 26 जानेवारी रोजी शालेय सामूहिक नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. 27 रोजी सायंकाळी रामायणामध्ये राम आणि सीता यांचे पात्र साकारणारे अभिनेते अरुण गोविल व दीपिका टोपीवाला यांची मुलाखत होणार आहे. 28 रोजी प्रसिध्द गायिका बेला शेंडे व सहायक संदीप यांचे गायन होणार आहे. तर 30 जानेवारी शंकर अभ्यंकर यांचे प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विरोधकांनीही दर्शन घ्यावे

येथे कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. त्यामुळे सर्वांनी दर्शन घ्यावे, यावेळी खाडेंनी मंदिर कामाची पाहणी केली. तसेच कामाबाबत सूचनाही केल्या. विरोधक 'राम मंदिर बनायेंचे तारीख नही' असे म्हणत होते. आता मंदिर बनलंय आणि तारीखही सर्वांना माहीत आहे. विरोध करणाऱ्यांनीही प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडेंनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Vishwajeet Kadam, Suresh Khade
Nagpur RTO : महिला निरीक्षकाने झाडली दुसऱ्यावर गोळी; कारण अद्यापही गुलदस्त्यात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com