Nagpur RTO : महिला निरीक्षकाने झाडली दुसऱ्यावर गोळी; कारण अद्यापही गुलदस्त्यात

Firing Case : प्रकरणाचा उलगडा करण्याचे आव्हान, दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा
Nagpur RTO Office.
Nagpur RTO Office.Sarkarnama
Published on
Updated on

Crime News : नागपूर शहरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात (RTO) सध्या एक खळबळजनक घटना गाजत आहे. आरटीओ निरीक्षक संकेत भारत गायकवाड (रा. सेंट्रल बाजार रोड, नागपूर) यांच्यावरील गोळीबाराचे हे प्रकरण आहे. गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणी तपास केल्यानंतर पोलिसांनी आरटीओच्या महिला निरीक्षक गीता शेजवळ आणि निरीक्षक संकेत भारत गायकवाड या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांच्या तपासात महिला निरीक्षक गीता शेजवळ यांनीच गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. शेजवळ यांनी यापूर्वी नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहे. शेजवळ यांच्या भोवती अॅन्टी करप्शन ब्युरोनेही फास आवळण्याचा प्रयत्न केला होता. अशातच आता एका गोळीबारप्रकरणी शेजवळ यांचे नाव आल्याने राज्यातील परिवहन विभागात खळबळ उडाली आहे.

Nagpur RTO Office.
Nagpur Politics : माझे आयुष्यही नितीन गडकरी यांना मिळो... कोण म्हणालं असं?

पोलिसांनी शेजवळ यांना प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात आरोपी केले आहे. त्याच प्रकरणात पुरावा नष्ट केल्याबद्दल आरटीओ निरीक्षक संकेत गायकवाड यांनाही आरोपी करण्यात आल्याने आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. शेजवळ यांनी गायकवाड यांच्यावर गोळी का झाडली याचे कारण शोधून काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. गोळीबाराचे हे प्रकरण अनेक दिवसांपासून चर्चेत होते. सुरुवातीला हा प्रकार लुटमारीचा असावा असे वाटत होते. मात्र पोलिसांनी याप्रकरणाचे सत्य उलगडण्यासाठी सखोल तपास सुरू केल्यानंतर आता धक्कादायक बाबी उघड होऊ लागल्या आहेत.

संकेत गायकवाड हे सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहेत. गीता शेजवळ या अहमदनगर येथे कार्यरत आहेत. 7 मे 2022 रोजी सकाळी गणवेश परिधान करताना गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. गोळी संकेत यांच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार निघून गायकवाड यांच्या उजव्या पायाच्या पोटरीत घुसली होती. गायकवाड यांनी याबाबत गीता शेजवळ व आरटीओचे निरीक्षक वीरसेन ढवळे यांना माहिती दिली. दोघांनी गायकवाड यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी नोंद घेतली होती. त्यानंतर तपासाला सुरुवात झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सखोल तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. गुन्हे शाखा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अधिकाऱ्यांचे बयाण घेण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला गायकवाड यांचे बयाण पोलिसांनी नोंदविले. पायावरून उंदीर गेल्याने दचकलो. त्यामुळे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खाली पडली. त्यातून गोळी सुटली व ती पोटरीत घुसल्याचे बयाण गायकवाड यांनी पोलिसांना दिले होते.

गायकवाड यांचे बयाण पाहता पोलिसांचा संशय बळावत गेला. त्यामुळे त्यांनी चौकशीचा फास अधिक कसणे सुरू केले. घटनेच्या दिवशी गायकवाड व शेजवळ या दोघांव्यतिरिक्त गायकवाड यांच्या घरी कोणीच नव्हते. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला. गीता शेजवळ यांनीच गोळीबार केल्याचे पोलिसांचे ठाम मत झाले. त्यामुळे त्यांनी त्यादृष्टीने तपासाला सुरुवात केली. अशात संकेत गायकवाड यांनी गोळीबारानंतर पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाले.

Nagpur RTO Office.
Nagpur Zilla Parishad : फायली रोखण्याचा मुद्दा गाजला स्थायी समितीच्या बैठकीत

पोलिसांनी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली. याबाबत गायकवाड यांना माहिती मिळताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे पोलिसांनी गोळीबाराच्या प्रकरणापर्यंत पोहोचता आहे. तपासानंतर गीता शेजवळ यांनी गायकवाड यांच्यावर गोळी झाडल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भातील काही ठोस पुरावे हाती लागल्यानंतरच शेजवळ यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले. आता शेजवळ यांनी हा गोळीबार का केला, याचे कारण पोलिस शोधत आहेत.

धक्कादायक बाबी येतील समोर

राज्यातील आरटीओ विभाग नेहमीच चर्चेत असतो. भ्रष्टाचाराचे आरोप तर आरटीओ विभागाबाबत नवे नाहीत. अशात एका अधिकाऱ्याने आपल्याच सहकारी अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याचे प्रकरण घडले आहे. त्यामुळे नागपूरच्या माध्यमातून राज्यातील परिवहन विभागातून मोठा गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Nagpur RTO Office.
Nagpur Congress : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे काम पूर्णत्वाकडे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com