Sangli News : कडेगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित निवासस्थानासाठी माजी मंत्री तथा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र राज्य गृह निर्माण व कल्याण महामंडळ यांच्या अंतर्गत कडेगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ५९ निवासस्थान (घरे) बांधण्यासाठी 19 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे कडेगाव पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. (Vishwajeet Kadam's efforts Kadegaon police station's employees houses of issue was solved)
कडेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये विकास कामांचा प्रारंभ माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (Vishwajeet Kadam Effort)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कदम म्हणाले, (स्व.) डॉ. पतंगराव कदम यांनी कडेगाव, पलूस तालुक्यासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी काम करीत आहे. सत्ता असो अथवा नसो विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कडेगाव शहर हे राज्यातील विकसित शहरात अग्रेसर राहील, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
कडेगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित होता. येथील पोलिसांना आपल्या कुटुंबासमवेत राहण्याची सोय व्हावी, यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे निवासस्थान उभारण्यात यावे, याबाबत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्याला यश मिळाले.
कडेगाव पोलिसांसाठी तब्बल 59 निवासस्थानं मंजूर झाली आहेत, त्यासाठी 19 कोटींचा निधी मिळाला आहे. कडेगाव शहरासह तालुक्यात शासकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापुढेही सातत्याने काम करणार आहे. कडेगाव शहर व तालुका विकासकामात सर्वात अग्रेसर राहील. विकास कामासाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नाही, असे डॉ. कदम यांनी सांगितले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.