Sharad Pawar News : शरद पवार यांच्यासाठी 80 वर्षांचा सहकारी मैदानात, भाजपला केले टार्गेट

NCP Crisis in Maharashtra : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार यांच्याबरोबर असलेले त्यांचे जुने कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
Dada kalamkar
Dada kalamkarsarkarnama
Published on
Updated on

Nagar : राष्ट्रवादीतील संघर्षामध्ये निवडणूक आयोगाने निकाल अजित पवार यांच्या बाजूने दिला. मात्र, शरद पवार गटातील नेते मात्र या निर्णयानंतर शरद पवार यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना करत आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत असलेले त्यांचे जुने सहकारी माजी आमदार दादा कळमकर यांच्या निवासस्थानी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर जुन्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी कळमकर 'सरकारनामा'शी बोलताना त्यांनी भाजपला टार्गेट केले. दादा कळमकर हे 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. NCP Crisis in Maharashtra

Dada kalamkar
Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मराठी गुरूच्या गावाला भेट देणार? 'स्वाभिमानी'ने पाठवले निमंत्रण

'80 वर्षाच्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ऊर्जेसमोर भाजप हरली आहे. त्यामुळेच पक्ष आणि पक्षाचे चिन्ह भाजपबरोबर गेलेल्या अजित दादांना दिले गेले. शरद पवार यांच्यासोबत आम्ही पहिल्यापासून आहोत आणि राहणार, असे कळमकर यांनी ठासून सांगितले. शरद पवार यांना सोडून गेलेल्यांची काय अवस्था झालेली आहे, हे अनेकांना माहित आहे. ते पुन्हा निवडणुकीत जिंकून आलेले नाहीत. पक्ष आणि पक्षाचे चिन्ह काढून घेतले म्हणजे शरद पवार हरतील, असे जर भाजपला (BJP) वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असा टोला कळमकर यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी 'ते' धान्य वाटत आहे

शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. हे महाराष्ट्रसह देशाने अनुभवले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांना मोफत अन्नधान्य वाटत आहेत. ते शरद पवार यांच्यामुळेच. त्यांनी दूरदृष्टी ठेवून भारताला कृषी प्रधान देश बनवले आणि त्यातून भारत अन्नधान्याने समृद्ध झाला. आज तेच अन्नधान्य गरिबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटत असल्याचा दावा माजी आमदार दादा कळमकर यांनी केला.

जुने कार्यकर्ते कामाला

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार यांच्याबरोबर असलेले त्यांचे जुने कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. त्यातीलच नगरचे माजी आमदार दादा कळमकर यांच्या निवासस्थानी बुधवारी वेगवान घडामोडी घडल्या. दिवसभर येथे बैठका सुरू होत्या. शरद पवार यांना साथ देण्यासाठी जु्न्या फळतील कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.

(Edited By Roshan More)

Dada kalamkar
Sharad Pawar Politics : दादांच्या 'या' सहा आमदारांचा थोरल्या पवारांनी केला असा बंदोबस्त!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com