Kurduwadi Solapur News : आगामी निवडणुका पाहता कुर्डूवाडी नगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी तालुक्यातील सर्व नेते सक्रिय झाले आहेत. कुर्डूवाडी नगरपालिका ही पश्चिम महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची ही एकमेव नगरपालिका म्हणून पाहिली जाते. सलग दहा वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी कुर्डूवाडी नगरपालिकेवरती भगवा कायम राखलेला आहे.
मागील एक-दोन वर्षांत सुमारे 25-30 कोटींची कामे आपण पूर्ण केल्याचा दावा धनंजय डिकोळे यांनी केला आहे. कुर्डूवाडी नगरपालिकेवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास धनंजय डिकोळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे धनंजय डिकोळे यांच्या सभोवताली अनेक भावी नगरसेवकांनी आत्तापासूनच तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्याचे काम सुरू केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कुर्डूवाडी नगरपालिकेत शिवसेनेचे धनंजय डिकोळे, रिपाइंचे बापूसाहेब जगताप आणि करमाळा विधानसभेचे आमदार संजय शिंदे असे तीन सक्रिय गट नगरपालिकेमध्ये कायम राहिलेले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये आमदार संजय शिंदे यांचा गट धनंजय डिकोळे यांच्या नगरपालिकेच्या विजयी भगव्या रथाला लगाम लावणार का? हे पाहणेदेखील उत्सुकतेचे असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला बापूसाहेब जगताप गटानेदेखील धनंजय डिकोळे यांच्यावर नाराज असलेल्यांना एकत्र करून कुर्डूवाडी नगरपालिकेची गोळा बेरीज करण्यात सुरुवात केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या दाखल्यानुसार विजय हा उद्धव ठाकरे यांचाच विजय होणार आहे. सत्तेचा दुरुपयोग करून आमचे चिन्ह आणि आमच्या पक्षाचे नाव तुम्ही घेऊ शकाल. परंतु जनतेचा पाठिंबा मात्र तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोक पाठिंबा देतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या वरती जे प्रेम केले तेच उद्धव ठाकरे यांच्यावरती लोक आज प्रेम करत आहेत. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना निवडणुकीतून मतपेटीतून लोक त्यांना रस्ता दाखवतील, असे म्हणत डिकोळे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.