Raju Shetti : ‘चोरमंडळ’ने शेतकऱ्याला विधानसभेतून गायब केले; पण शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्यांनी एवढी गोष्ट करावीच’

शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून बिरूदावली लावणाऱ्यांनी झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी विधानसभेत या गोष्टीवर आवाज उठवावा.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama

सोलापूर : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीपात अतिवृष्टीमुळे आणि रब्बीत अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीमुळे बळीराजा पुरता खचला आहे. पीकविमा कंपन्या नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहेत, त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षातील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून बिरूदावली लावणाऱ्यांनी झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी विधानसभेत या गोष्टीवर आवाज उठवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. (Voice should be raised in the Assembly regarding the compensation of farmers : Raju Shetti)

अवकाळी आणि गारपीटीमुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष, गहू भुईसपाट झाले आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपात मुसळधार पाऊस झाल्याने पिके वाहून गेली, तर रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना आवाहन केले आहे.

Raju Shetti
Nagaland First Woman Minister : सलहौतुओनुओ क्रूस बनल्या नागालॅंडच्या पहिल्या महिला मंत्री

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातील ज्वारी, द्राक्ष, मका, केळी, पपई, गहू, हरभरा, तूर, कांदा, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीकविम्या कंपन्या या सरकारच्या जावई असल्यामुळे नेहमीप्रमाणे यावेळसही ते शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहेत, त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.

Raju Shetti
Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; 270 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

गेल्या आठवड्यापासून विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. पहिले दोन दिवस सभागृहात शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा झाली. पण ‘चोरमंडळ’ या एका शब्दाने शेतकऱ्याला विधीमंडळातूनच गायब केले. आतातरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून बिरुदावली लावणाऱ्यांनी झोपेचे झोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी उद्या (ता. ८ मार्च) तरी विधानसभेत या गोष्टींवर आवाज उठवावा, अशी विनंती केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com