Nagaland First Woman Minister : सलहौतुओनुओ क्रूस बनल्या नागालॅंडच्या पहिल्या महिला मंत्री

सलहौतुओनुओ क्रूस या प्रथमच विधानसभेत निवडून आल्या आहेत. त्यांनी अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवाराचा अवघ्या सात मतांनी पराभव केला आहे.
Salhautuonuo Krus
Salhautuonuo KrusANI
Published on
Updated on

नवी दिल्ली : नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (NDPP) पक्षाचे नेते नेफ्यू रिओ यांनी पाचव्यांदा नागालँडचे (Nagaland) मुख्यमंत्री म्हणून आज (ता. ७ मार्च) शपथ घेतली. त्यांच्या या मंत्रिमंडळात प्रथमच महिलेला संधी मिळाली आहे. नागालॅंड विधानसभेत प्रथमच निवडून आलेल्या सलहौतुओनुओ क्रूस यांना राज्यातील पहिल्या मंत्री बनण्याचाही मानही मिळाली आहे. (Salhautuonuo Krus became Nagaland's first woman minister)

Salhautuonuo Krus
Sangola Politics : गणपतराव देशमुखांच्या पट्टशिष्याला आमदारकीचे वेध; राष्ट्रवादीच्या साळुंखेंना आशीर्वादासाठी घातले साकडे

नागालॅंडमध्ये विरोधी पक्षविरहित विधानसभा असणार आहे. कारण, सर्वपक्षीयांनी सरकार स्थापन करण्यासाठी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात विरोधी पक्ष असणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित मुख्यमंत्री रिओ, उपमुख्यमंत्री म्हणून झेलियांग आणि पॅटन यांनी शपथ घेतली. याव्यतिरिक्त नऊ आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या सर्वांचे मोदी, शहा यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री रिओ यांच्या व्यतिरिक्त, तादितुई रंगकाऊ झेलियांग आणि यानथुंगो पॅटन यांनी नागालँडचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच, मुख्यमंत्री रिओ यांच्या सरकारमध्ये अन्य नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यापैकी जी कैटो आये, जेकब झिमोमी, केजी केन्ये, पी पायवांग कोन्याक, मेत्सुबो जमीर, टेम्जेन इम्ना अलॉन्ग, सीएल जॉन, पी बाशांगमोंगबा चांग आणि नागालँडच्या पहिल्या महिला आमदारांपैकी एक असलेल्या सलहौतुओनुओ क्रूस यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Salhautuonuo Krus
Devendra Fadnavis : बदला घेण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचे पुन्हा मोठे विधान...

नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या सलहौतुओनुओ क्रूस या प्रथमच विधानसभेत निवडून आल्या आहेत. त्यांनी पश्चिम अंगामी या मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवाराचा अवघ्या सात मतांनी पराभव केला आहे. त्यांना रिओ यांच्या मंत्रिमंडळात प्रथमच संधी मिळाली आहे.

Salhautuonuo Krus
Sarpanch Election : सरपंचाच्या निवडणुकीत ट्विस्ट; शिंदेगावातील दोन ग्रामपंचायत सदस्य अचानकपणे सहलीवर; कुटुंबीयाकडून अपहरणाची तक्रार

दरम्यान, नागालॅंड मंत्रिमंडळात संधी मिळाल्याबद्दल सलहौतुओनुओ क्रूस यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, नागालॅंडमध्ये पहिला महिला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो. महिला कठोर परिश्रम आणि प्रामाणिक असल्यास सर्व कामे देखील करू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com