Satara Dcc Bank Election : 14 मतांच्या पराभवाचा डाग पुसण्यासाठी शंभूराज देसाईंची स्ट्रॉग स्ट्रॅटेजी; पाटणकरही सावध, ठराव झालेले मतदार हलविले अज्ञातस्थळी

Shambhuraj Desai-Satyajeet Patankar News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी पाटण तालुक्यात शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर गटाची मोर्चेबांधणी वेगात असून मतदार हलवल्याची चर्चा रंगली आहे.
shambhuraj desai-satyajeet patankar
shambhuraj desai-satyajeet patankarSarkarnama
Published on
Updated on

Patan, 27 July (सूर्यकांत पाटणकर) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे. पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातही पडद्यामागील हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे. मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी शंभूराज देसाईंनी पहिल्या दिवसांपासूनच जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दुसरीकडे, पाटणकर गटानेही जिल्हा बॅंकेतील आपली सत्ता कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातूनच सोसायटी मतदार संघातून ठराव झालेले मतदार अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याची चर्चा आहे.

जिल्हा बँकेच्या गेल्या निवडणुकीत पाटण तालुक्यात पाटणकर व मंत्री देसाई यांच्यात लढत झाली होती. त्यात मंत्री देसाईंचा १४ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत मंत्री देसाई हे गेल्या वेळच्या पराभवाची परतफेड करणार असल्याचे बोलले जात आहे. १०५ मतदार असलेल्या सोसायटी मतदारसंघातून ५२ मते मिळवणारा उमेदवार विजय होणार आहे.

मंत्री देसाई यांनी जिल्हा बँकेतील पराभव झालेल्या दिवसापासून सोसायटी निवडणुकांत लक्ष घालून अनेक सोसायट्यांत देसाई गटाची सत्ता खेचून आणली आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत मंत्री देसाई यांचा जिल्हा बँकेतील प्रवेश निश्चित मानला जात आहे.

आजपर्यंत जिल्हा बँकेत वर्चस्व अबाधित ठेवलेल्या पाटणकर गटानेही जिल्हा बँकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सोसायटी मतदारसंघाचे ठराव आपल्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत, तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी ठराव झालेले मतदार अज्ञातस्थळी पाठवल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक रंगतदार स्थितीत होणार, हे निश्चित.

सध्या मंत्री देसाई हे शिवसेनेचे राज्यातील वजनदार मंत्री आहेत. पाटणकर यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्याचे दोन्ही नेते महायुतीत आहेत; परंतु तालुक्याच्या राजकारणात दोन्ही नेत्यांची परस्परविरोधी भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतील, हे पाहणे गरजेचे आहे.

shambhuraj desai-satyajeet patankar
Satara Politic's : शिवेंद्रराजेंनी निवडणुकीआधीच गेम फिरवला; सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महत्वाची घडामोड...

जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या संचालकांची संख्या जास्त आहे. जिल्हा बँकेत खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री देसाई हे महायुती म्हणून जिल्हा बँकेची निवडणूक एकत्र लढवल्यास पाटण तालुक्यातील स्थिती कशाप्रकारे हातळणार? यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

सहकारी निबंध कार्यालयात ५ ऑगस्टपर्यंत ठराव देण्याची अंतिम मुदत आहे. त्यासाठी दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते निबंधक कार्यालयात ठाण मांडून आहेत. प्रत्येक गावच्या सोसायटीच्या ठरावावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ठरावासाठी कार्यकर्त्यांतील मतभेद मिटविण्याची तंबी कार्यकर्त्यांना दिली जात आहे. विश्वासू संचालकाचा ठराव मतदानासाठी केला जात आहे.

सत्यजितसिंह, की याज्ञसेन पाटणकर?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्री देसाई रणांगणात असणार, हे नक्की मानले जात आहे. मात्र, पाटणकर गटाकडून विद्यमान संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांना पुन्हा संधी मिळणार? की त्यांचे बंधू भाजपचे जिल्हा सरचिटणीस याज्ञसेन पाटणकर हे निवडणूक लढवणार? याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत.

shambhuraj desai-satyajeet patankar
Anandraj Ambedkar : सरकार आमच्यातच वाद लावतंय; पण आम्ही ते होऊ देणार नाही : आनंदराज आंबेडकरांचा इशारा

शंभूराज देसाई सध्या प्लसमध्ये

जिल्हा बँकेला एका-एका मतदारासाठी जोरदार प्रयत्न चालवले जात आहे. मंत्री देसाई यांचा गेल्या वेळी १४ मतांनी पराभव झाल्याची सल कार्यकर्त्यांच्याही मनात आहे. त्यात अनेक कार्यकर्त्यांनी देसाई गटात प्रवेश केल्याने अनेक सोसायटीच्या निवडणुकीत देसाई गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत देसाई-पाटणकर गटांचे बलाबल पाहता पालकमंत्री देसाई यांच्याकडे नऊ मतांची आघाडी असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com