Solapur, 19 November : सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातून १८४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यात एकूण ३ हजार ७३८ मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी सातपासून सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे.
दरम्यान, जिल्हा पोलिस प्रशासनाने मतदानासाठी तगडा बंदोस्त ठेवला असून ११ हजार पोलिस बंदोबस्ताठी नेमण्यात आले आहेत. या शिवाय सशस्त्र पोलिसांच्या १२ तुकड्याही त्यांच्या मदतीला असणार आहेत.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातून १८४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठी चोख नियोजन केले आहे. त्यानुसार मतदान केंद्रांबाहेरील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ५१० सीसीटीव्ही आणि २२ ड्रोन कॅमेरे असणार आहेत.
सोलापूर शहरात १ हजार १८३ केंद्रांवर मतदारांना मतदान करता येणार आहे, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दोन हजार ५५५ मतदान केंद्रे असणार आहेत, असे सोलापूर जिल्ह्यात एकूण ३७३८ मतदान केंद्रे असणार आहेत. जिल्ह्यात मतदानाचे एकूण २९१० बूथ असून शहरात ८२४ बूथ असणार आहेत.
मतदानाला सुरुवात झाल्यापासू प्रक्रिया संपेपर्यंत प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही असणार आहेत. संवदेनशिल मतदान केंद्रांवर पेालिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असणार आहे. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी पुरेपूर खबरदारी घेतली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे ४,५०० अधिकारी आणि अंमलदार असणार आहेत. याशिवाय अडीच हजार होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र पोलिस बलाच्या ९ तुकड्या ग्रामीण भागात बंदोबस्तासाठी असणार आहेत.
सोलापूरमधील शहरी भागात बंदोबस्तासाठी तब्बल अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी असणार आहेत. त्यांच्या मदतीसाठी सहाशे होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या चार तुकड्या कार्यान्वित असणार आहेत, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.