Sharad Pawar News : राज्यात भूकंप कधी होतोय याची वाट पाहतोय; शरद पवारांनी हवाच काढली

Sharad Pawar earthquake comments : राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा एकदा फुटणार याच्या चर्चा रंगल्या असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या दाव्याची हवाच काढली.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रोज शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे हे नेते संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. या दाव्यानुसार राज्यात पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना पुन्हा एकदा फुटणार याच्या चर्चा रंगल्या असतानाच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या दाव्याची हवाच काढली. उदय सामंत यांच्यावर मिश्किल टिपणी केली. राज्यात राजकीय भूकंप कधी होतो? आणि कधी बाहेर पडतात याची मी वाट पाहतोय, अशा शब्दांत शरद पवार यांनी टिप्पणी केली.

पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपण बंद खोलीत चर्चा केली, ती राष्ट्रवादी पक्षाबाबत नव्हे तर एका प्रकल्पाबाबत केली, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले. नवीन सहकार मंत्र्यांना आपल्याशी दोन-तीन विषयावर बोलायचे होते, त्यामुळेच त्या कार्यक्रमात खुर्चीची अदलाबदल केली, असेही शरद पवार (sharad Pawar) यांनी सांगितले.

Sharad Pawar
Tanaji Sawnat : तानाजी सावंतांची नाराजी कायम; सेनेच्या मेळाव्याला दांडी, मतदारसंघाकडे फिरवली पाठ!

त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांच्यातील याबाबतच बोलणं झालं. राष्ट्रवादी पक्षाच्या राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thacekeray) यांनी आपली भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची त्यांची इच्छा आहे. पण याबाबत त्यांची टोकाची भूमिका नव्हती. त्यांची समजूत आम्ही काढली असल्याचे पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar
Uddhav Thackeray News : कोकणात भाजपचा ठाकरेंना दणका, नगरपंचायतीत पराभव; एका नगरसेवकानं केला गेम

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपचा पाठिंबा काढून घेतील, असे वाटत नाही, ते डोक्यातून काढून टाका. राज्याचे उद्योग मंत्री सामंत हे दावोसला गुंतवणूक करण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला गेले होते, असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Sharad Pawar
Vijay Wadettiwar : "...तर महापालिकेत"; उद्धव ठाकरेंच्या 'एकला चलो'च्या वक्तव्यानंतर काँग्रेसनेही स्पष्ट केली आपली भूमिका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com