Gram Panchayat Election : मला सरपंच झाल्यासारखं वाटतंय! ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवारच मिळेना...

Samadhan Avtade, Bagirath Bhalke : मंगळवेढ्यातील गावागावांतील नेत्यांना आजी-माजी आमदार बळ देणार?
Prashant Paricharak, Bagirath Bhalke, Samadhan Bhalke
Prashant Paricharak, Bagirath Bhalke, Samadhan BhalkeSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजलेले आहे. दिवाळीपूर्वी या ग्रामपंचायतींना नवे पदाधिकारी मिळणार आहेत. यासाठी प्रत्येक गावातील विविध गटांच्या पदाधिकाऱ्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यातून तालुक्यात सरपंच पदाचेच डोहाळे अनेकाला लागल्याचे दिसून येत आहे. मात्र, सदस्य पदासाठी कोणीही उत्सुक असल्याचे दिसत नाही. सदस्यपदासाठी उमेदवार शोधून गावागावांतील नेत्यांना त्यांची मनधरणी करताना दमछाक होत आहे. (Latest Political News)

गेल्या वर्षभरापासून रखलेल्या आंधळगाव, नंदूर, लक्ष्मी दहिवडी, खुपसंगी, रड्डे, खडकी, बठाण, मुंढेवाडी, हिवरगाव, महमदाबाद हु, अकोला, शेलेवाडी, डिकसळ, जालीहाळ, लोणार, मानेवाडी, शिरसी, जंगलगी, रेवेवाडी, पडोळकरवाडी, देगाव, उचेठाण, निंबोणी, चिक्कलगी, जुनोनी, ब्रम्हपुरी, भाळवणी या २७ ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली. एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. (Maharashtra Political News)

Prashant Paricharak, Bagirath Bhalke, Samadhan Bhalke
Ajit Pawar PDCC Bank : अजित पवारांच्या पीडीसीसी संचालक पदाच्या राजीनाम्याचा डाव का अन् कुणासाठी ?

या निवडणुकीनंतर सहा महिन्यांत लोकसभा निवडणूक आहे, तर ११ महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे. या परिस्थितीत आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक बीआरएसचे भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे अभिजित पाटील व बबनराव अवताडे यांचे गट या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. या नेत्यांना आपले राजकीय वर्चस्व वरिष्ठ नेत्यांना दाखवण्यासाठी या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरणाऱ्या आर्थिक ताकद द्यावी लागणार आहे.

सरपंच पद हे थेट जनतेतून असल्यामुळे सध्या सरपंच होण्याचे डोहाळे अनेकांना लागले. मात्र, सदस्य पदासाठी इच्छुकांची संख्या अतिशय नगग्न आहे. त्यामुळे सदस्य पदाचा उमेदवार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. १४ व १५ व्या आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायत खात्यावर जमा होत आहे. तसेच अन्य निधीच्या माध्यमातून विकासकामे करताना यातून आर्थिक उत्पन्नाच्या संधीही असते. यामुळे गावपातळीवरील नेत्याचा सरपंच पदावरच डोळा लागला. परिणामी सदस्य होणाऱ्यांना फारसे महत्त्व नसल्याचे दिसून येत आहे.

Prashant Paricharak, Bagirath Bhalke, Samadhan Bhalke
NIA Action on PFI : NIA ने फास आवळला; मुंबईसह देशभरात PFI वर छापेमारी

निवडणूक जाहीर झाली असली तरी सदस्य पदांसाठी इच्छुकांची संख्या मात्र कमी आहे. त्यामुळे आता सरपंच होणाऱ्यालाच सदस्य पदाचे उमेदवार शोधावे लागणार आहेत. सदस्य पदाच्या उमेदवारांच्या निवडीपासून संबंधितांच्या ग्रामपंचायत कराची थकबाकी व निवडणुकीचा संभाव्य खर्चाचीही जबाबदारीही सरपंच इच्छुकालाच करावा लागणार आहे. परिणामी ऐन दिवाळीत सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्यांचे दिवाळं निघणार असल्याचे बोलले जात आहे.

ग्रामपंचायत सदस्य पदासाठी कुणीही इच्छुक नसल्याने सरपंच होणाऱ्या इच्छुकांची मोठी दमछाक होताना दिसत आहे. तालुक्यातील अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या आखाड्यात गावागावांतील नेत्यांची धावपळ सुरू झालेली आहे. परिणामी आपल्या गटाचा तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण होण्यासाठी आजी-माजी आमदारांसह इच्छुकांवरही मोठे दडपण आहे. गावागावांतील नेत्यांना सर्व पातळीवर पाठिंबा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आपोआपच येऊन पडली आहे. यात जो बाजी मारणार, तोच तालुक्याचा प्रतिनिधी होणार, असेच काहीसे चित्र मंगळवेढ्यात दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Prashant Paricharak, Bagirath Bhalke, Samadhan Bhalke
Lalit Patil News : ड्रगमाफिया ललित पाटलाचे भुसेंसोबत कनेक्शन काय ? ठाकरे गटाचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com