Lalit Patil News
Lalit Patil NewsSarkarnama

Lalit Patil News : ड्रगमाफिया ललित पाटलाचे भुसेंसोबत कनेक्शन काय ? ठाकरे गटाचा आरोप

Sasoon Hospital Drug Racket : पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवणारा ड्रगमाफिया ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला.
Published on

Pune News : पुण्यातील ससून शासकीय रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवणारा ड्रगमाफिया ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. गेल्या आठ दिवसांपासून ललित पाटील बेपत्ता आहे, पण आता या घटनेत राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री दादा भुसे यांच्याकडे बोट दाखवले जात आहे.

ललित पाटील याचे मातोश्रीवरील फोटो व्हायरल झाले आहेत, पण दादा भुसे हेच ललित पाटीलला मातोश्रीवर घेऊन आले होते. शिंदे गटाचे आमदार आणि विद्यामन मंत्री दादा भुसे यांनीच ललितला रुग्णालयातून पळून जाण्यात मदत केली. असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Lalit Patil News
Lalit Patil News : पोलिसांनी ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा फास आवळला; नाशिकमधील भावाच्या कारखान्यावर छापेमारी

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ससूनचे डीन आणि दादा भुसेंवर गंभीर आरोप केले आहेत. 'ससून रुग्णालयाचे आधीचे आणि आताचे अधिष्ठाता (डीन) यांची चौकशी झाली पाहिजे, गोपनीयतेच्या कायद्यानुसार डॉक्टरांना काही माहिती खुली करता येत नाही.

पण ललित पाटीलला कोणता आजार होता, गेल्या नऊ महिन्यांपासून त्याच्यावर कोणते उपचार सुरू होते, कोणत्या डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार झाले, त्याला कोणता आजार होता, याचे तर डीन नक्कीच सांगू शकतात, त्यामुळे त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं.'

जर डीन हे सर्व सांगू शकत नसतील, नऊ महिन्यांपासून ससूनसारख्या ठिकाणावरून जर ड्रग्ज रॅकेट चालू होतं, ही बाब गंभीर आहे. यावर गृहमंत्र्यांनी बोललं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याचवेळी त्यांनी दादा भुसेंवरही आरोप केले आहे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनीही या प्रकरणात शिंदे गटाच्या आमदाराचे नाव घ्यावे, नाशिकशी संबंधित गोष्ट आहे, असे आम्ही सांगत आहोत. दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करा, यात इतके लागण्यासारखे काय आहे, असा प्रश्नही सुषमा अंधारेंनी उपस्थित केला.

Edited By- Anuradha Dhawade

Lalit Patil News
Koregaon Political News : जावळी की कोरेगाव; शशिकांत शिंदेंचं अखेर ठरलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com