पारनेर नगर पंचायतचे प्रभाग आरक्षण जाहीर

पारनेर ( Parner ) नगर पंचायतची प्रभाग आरक्षण सोडत आज काढण्यात आली.
Nagar Panchayat election
Nagar Panchayat electionsarkarnama
Published on
Updated on

पारनेर ( अहमदनगर ) : जिल्ह्यातील विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेली आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या व डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या नगर पंचायती व नगर पालिकांच्या निवडणुकांची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्या अंतर्गत आज पारनेर नगर पंचायतची प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. Ward reservation of Parner Nagar Panchayat announced

नव्याने पारनेर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी आज (सोमवारी ) प्रांताधिकारी सुधाकर भोसले व मुख्याधिकारी डॉ सुनीता कुमावत यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आले. यात या पूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणा नुसार अनेक इच्छुकांनी केलेला मतदारावरील खर्च नवीन आरक्षणामुळे वाया गेला आहे.

Nagar Panchayat election
विधान परिषदेसाठी बिगूल : मतदारयादीचे निकष जाहीर; मुदत संपलेले नगरसेवक हळहळले

सुमारे वर्षभरापूर्वी पारनेर नगरपंचायतसाठी आरक्षण जाहीर झाले होते. मात्र एक इतर मागासवर्गीय जागेचे आरक्षण रद्द झाल्याने आज नव्याने आरक्षण काढण्यात आले. यात काही प्रभागातील आरक्षणात बदल झाला आहे. त्यामुळे इच्छुकांची कही खुशी कही गम अशी स्थिती निर्माण झाली आहे. हीच स्थिती विविध राजकीय पक्षांची झाली आहे. त्यांनाही नव्याने काही प्रभागांत नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत.

अनेक इच्छुक उमेदवारांनी दिवाळी भेट वस्तू व मतदारांच्या सहलीवरील अनेकांनी केलेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळे अनेक जणांचा हिरमोड झाला. तर काही जण मात्र सुखावले आहेत.

Nagar Panchayat election
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढाईच्या सेमीफायनलची तयारी जोरात

17 प्रभागात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढण्यात आली ते पुढील प्रमाणे :

प्रभाग आणि आरक्षण :- ( कंसात प्रभाग क्रमांक )

सर्वसाधारण महिला (प्रभाग एक)

नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला (प्रभाग दोन)

सर्वसाधारण (प्रभाग तीन)

सर्वसाधारण (प्रभाग चार)

सर्वसाधारण (प्रभाग पाच)

सर्वसाधारण महिला (प्रभाग सहा)

सर्वसाधारण महिला (प्रभाग सात)

अनुसूचित जाती (प्रभाग आठ)

सर्वसाधारण (प्रभाग नऊ)

सर्वसाधारण महिला (प्रभाग 10)

नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला (प्रभाग 11)

सर्वसाधारण महिला (प्रभाग 12)

नागरिकाचा मागास प्रवर्ग (प्रभाग 13)

नागरिकाचा मागास प्रवर्ग (प्रभाग 14)

सर्वसाधारण महिला (प्रभाग 15)

सर्वसाधारण (प्रभाग 16)

सर्वसाधारण महिला (प्रभाग 17)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com