Solapur News : 'फडणवीस आता तुमची वेळ...'; चंद्रकांतदादांवर शाई फेकणाऱ्या भीम आर्मीचा इशारा

Bhim Army News : शाईफेक करणारे भीम आर्मीचे महिंद्रकर यांच्या विरोधात पोलिसांनी ३५३ चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Ashok Kamble-Devendra Fadnavis
Ashok Kamble-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ink Threw on Chandrakant Patil : सोलापूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करणारे भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष अजय महिंद्रकर यांच्यावरील ३५३ चा गुन्हा मागे घ्या; अन्यथा खासगीकरणाच्या विरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही शाई फेकण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे. त्यामुळे खासगीकरणाच्या विरोधात असंतोष वाढत जाण्याची शक्यता आहे. (Warning to CM, DCM of Bhim Army who threw ink on Chandrakant Patil)

सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जाहीर झाल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी खासगीकरण धोरणाच्या विरोधात भीम आर्मीकडून पाटील यांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. त्याचवेळी भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष महिंद्रकर यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला होता. कडेकोट पोलिस बंदोबस्तात शाई फेकण्यात आली होती. दुसरीकडे धनगर आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी आलेले धनगर आरक्षण कृती समितीचे शेखर बंगाळे यांना अटक करण्यात आली आहे.

Ashok Kamble-Devendra Fadnavis
Satara Politics : मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला सरकारमध्ये किंमत आहे का?; सदाभाऊंचा सवाल

दरम्यान, शाईफेक करणारे भीम आर्मीचे महिंद्रकर यांच्या विरोधात पोलिसांनी ३५३ चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यावरून भीम आर्मी आक्रमक झाली आहे. अजय मैंदर्गीकर यांच्यावरील ३५३ चा गुन्हा मागे घ्या; अन्यथा येत्या काळात खासगीकरणाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांवरही शाईफेक करण्याचा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला.

तर एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही

खासगीकरणाच्या विरोधात भीम आर्मीचे देशभरात आंदोलन सुरू आहे. भीम आर्मीचे अजय महिंद्रकर यांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना खूप मारलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या दबावामुळे महिंद्रकर यांच्यावर ३५३ चा गुन्हा दाखल केलेला आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पोलिस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडून महिंद्रकर यांच्या जिवाला धोका आहे. त्यांच्या जिवाचे बरे वाईट झाल्यास चंद्रकांत पाटील आणि भाजप सरकारच्या एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असेही कांबळे यांनी स्पष्ट केले.

Ashok Kamble-Devendra Fadnavis
Ambegaon NCP News : आंबेगावात शिंदे गटाला धक्का; युवा सेनेच्या जिल्हा सरचिटणीसांचा राष्ट्रवादीत प्रवेश

कांबळे म्हणाले की, खासगीकरणाच्या विरोधात आम्ही एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात मंत्र्यांच्या दारात आंदोलन करणार आहोत. चंद्रकांत पाटील, सरकारचे सर्व मंत्री आणि भाजपचे आमदार आणि खासदारांना इशारा देतो, की महिंद्रकर यांच्या विरोधात लावण्यात आलेला ३५३ चा गुन्हा मागे घेण्यात यावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये; अन्यथा सरकार बदल्यावर आम्ही पोलिसांचाही वाट लावू. आमच्या कार्यकर्त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणार असाल, तर आम्ही तुमची वाट लावू.

Ashok Kamble-Devendra Fadnavis
Deora Will Join NCP : मिलिंद देवरा राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; प्रफुल्ल पटेलांसोबत दोनदा भेट

देवेंद्र फडणवीस आता तुमची वेळ आलेली आहे, तुमच्यावरही शाईफेक करण्यात येईल. तुमच्याही गाड्या अडविण्यात येतील. आमच्या कार्यकर्त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करू नका. खासगीकरणाचा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा; अन्यथा तुमच्या विरोधात वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही कांबळे यांनी दिला.

Ashok Kamble-Devendra Fadnavis
Meera Borwankar News : माजी पोलिस आयुक्तांच्या आरोपामुळे ‘दादा’ अडचणीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com