Rajedra Patil Yadravkar : पाण्यावरून पेटला 'वणवा'; आमदार यड्रावकरांच्या कारखान्याची तोडफोड, परिस्थिती तणावपूर्ण!

yadravkar factory vandalism news : मळी मिश्रित पाणी नदीत सोडल्याच्या आरोपानंतर संतप्त ग्रामस्थांनी आमदार यड्रावकरांच्या कारखान्याची तोडफोड केली, परिसरात तणाव.
Rajedra Patil Yadravkar : पाण्यावरून पेटला 'वणवा'; आमदार यड्रावकरांच्या कारखान्याची तोडफोड, परिस्थिती तणावपूर्ण!
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात भेंडवडे येथे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत सोडल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना पाहून ग्रामस्थांनी शरद कारखानासमोर संताप व्यक्त केला. मळी मिश्रित पाणी नदीत मिसळत असल्याने पाणी दूषित होत आहे. त्यामुळे आम्ही पाणी प्यायचे का? विषय प्यायचे असे म्हणत रोष व्यक्त केला.

शेवटी संताप अनावर झाल्याने ग्रामस्थानी कारखान्यावर दगडफेक केली. कारखान्याकडून मळी मिश्रित व काळे पाणी परिसरातील नदीत सोडण्यात येत असल्याचा आरोप करत भेंडवडेसह शेजारील गावातील ग्रामस्थांनी थेट कारखान्यावर धडक मोर्चा काढत दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Rajedra Patil Yadravkar : पाण्यावरून पेटला 'वणवा'; आमदार यड्रावकरांच्या कारखान्याची तोडफोड, परिस्थिती तणावपूर्ण!
NCP leader kidnapping : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला भररस्त्यातून उचललं ; अपहरण करून बेदम मारहाण; थरार 'सीसीटीव्हीत' कैद

भेंडवडे परिसरातील नदी व पाणवठ्यांमध्ये कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे पाणी प्रदूषित होत असून याचा थेट परिणाम शेती, जनावरांचे पाणी तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा कारखाना प्रशासनाला लेखी व तोंडी सूचना दिल्या होत्या. मात्र, यानंतरही कारखान्याकडून सांडपाणी सोडणे सुरूच राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला.

या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी कारखान्यावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी वाद वाढत गेला आणि काही ग्रामस्थांनी थेट कारखान्याच्या दिशेने दगडफेक केली. या प्रकारामुळे काही काळ कारखान्याचे कामकाजही बंद पडले. परिस्थिती चिघळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली व तणाव निवळला.

Rajedra Patil Yadravkar : पाण्यावरून पेटला 'वणवा'; आमदार यड्रावकरांच्या कारखान्याची तोडफोड, परिस्थिती तणावपूर्ण!
Prashant Jagtap Resigns: पुण्याच्या राजकारणातील मोठी बातमी; दोन्ही राष्ट्रवादीची गट्टी जमली अन् शरद पवारांच्या शिलेदाराने साथ सोडली

दरम्यान, या घटनेनंतर कारखाना प्रशासनाकडून काही दिवसांत याबाबत योग्य निर्णय घेऊन प्रदूषणासंदर्भात ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, ग्रामस्थांनी कारखान्याकडून ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com