Amit Shah Statement : अमित शाहांचा राज्यसभेतील ‘तो’ व्हिडिओ आम्ही मागतोय; पण सरकार देत नाय; प्रणिती शिंदेंचा आरोप

Praniti Shinde's Allegation : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावर अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे, ही आमची भूमिका आहे.
Amit Shah-Praniti Shinde
Amit Shah-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 December : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे बोलले आहेत, ते रेकॉर्डवर आहे, आम्ही अर्काईव्हमधून तो व्हिडीओ सरकारकडे मागतोय. मात्र, ते देत नाहीत. डॉ. आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावर अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे, ही आमची भूमिका आहे, असे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात बोलताना सांगितले.

केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit shah) यांनी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली, त्यात खासदार शिंदे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आम्हाला स्वर्ग नको आहे, राष्ट्रीय आराध्य देवतेचे नावं भाजपवाले फॅशन म्हणून घेतात. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान मिळवून दिलाय, त्यामुळे आम्हाला स्वर्ग नकोय.

संसदेतही आम्ही अमित शाह यांचा निषेध व्यक्त केला आहे. हा निषेध केवळ भाजप विरोध काँग्रेस राहिला नाही तर बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांची लढाई झाली आहे. घरोघरी, गल्लोगल्ली ही लढाई सुरु राहिली पाहिजे. अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी आणि इंडिया आघाडी या घटनेचा निषेध करत आहे, असेही खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde)यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, आम्हाला संविधानावर आणखी चर्चा हवी होती. पण, भाजपने ती होऊ दिली नाही. वैयक्तिक टीका आणि आरोप करण्यात यांनी वेळ घालवला. त्यांना संविधान मान्य नाही, ते केवळ मनुस्मृती मानतात. संघाने कायम तिरंग्याचा, संविधानाचा अपमान केला आहे. अचानक त्यांच्या मनात आता संविधान आणि तिरंग्याबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे. संविधान बदलण्यासाठी त्यांना चारशे पार पाहिजे होतं. पण, या देशाच्या जनतेने ते होऊ दिलं नाही. जनतेने हे चालू दिलं नाही; म्हणून त्यांच्या मनात अचानक प्रेम निर्माण झालं

Amit Shah-Praniti Shinde
Praniti Shinde : सोलापूरला मंत्रिपद का मिळालं नाही; प्रणिती शिंदेंनी सांगितलं नेमकं कारण...

अमित शाह यांचा खरा चेहरा संसदेत समोर आला आहे. त्यांचं संविधान बदलण्याचे कटकारस्थान नेहमी सुरु असतं. अमित शाह जे बोलले ते केवळ एक संदर्भ नाही. अशा अनेक गोष्टी ते करत आहेत. पण, जोपर्यंत इंडिया आघाडी आहे; तोपर्यंत हे होऊ देणार नाही. प्रत्येक वेळी असं घडलं की हे विषयांतर करतात. उद्या आम्ही सोलापुरात एक मोर्चा काढणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत हा मोर्चा जाईल, असेही प्रणिती यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, अमित शाह जे बोलले ते रेकॉर्डवर आहे, आम्ही अर्काईव्हमधून तो व्हिडीओ मागतोय, मात्र ते देत नाहीत. भाजपला मोर्फ करण्याची सवय आहेत, त्यामुळेच ते उलट आमच्यावर असले आरोप करतात (व्हिडीओ कट केल्याचा आरोपवर). संविधान कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखं आहे, असं विधान संघाच्या लोकांनी केलेलं आहे.

Amit Shah-Praniti Shinde
Guardian Minister : आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; सातारा अन्‌ सोलापूरवर सुटणार पश्चिम महाराष्ट्राचे गणित!

तिरंग्यात तीन रंग असल्याने त्यांनी अशुभ असल्याचे म्हटले होते. आता अचानक त्यांना तिरंगा आणि संविधानबाबतीत प्रेम निर्माण झालेलं आहे. परभणीमध्ये जे घडले, त्या सूर्यवंशी यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. भाजप सत्तेत आल्यानंतरच अशा गोष्टी घडायाला सुरुवात होते. राहुल गांधी उद्या परभणीला येणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com